मुंबई : प्रत्येक धर्मामध्ये परस्परांमध्ये बंधुभाव, मानवता व देशभक्तीच्या शिकवणीला महत्त्व दिले आहे. त्याच्या आचरणावरच त्याची ओळख निश्चित होणार आहे. त्यामुळे या तत्त्वाला अनुसरून राष्ट्रीय एकात्मता व शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, असे प्रतिपादन विविध धर्मगुरूंनी अंधेरीतील क्रीडा संकुलात झालेल्या समारंभात केले. जमात-ए-इस्लामी हिंंदच्या वतीने ‘नफरत का नाश, मानवता का विकास’ या एकात्मता वृद्धीकरणाच्या मोहिमेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या वेळी विविध धर्मांतील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय एकात्मता व जनजागृतीसाठी या संघटनेच्या वतीने गेल्या २० डिसेंबर ते ७ जानेवारीपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात आली होती. त्याच्या समारोपप्रसंगी दिल्लीतील धर्म अभ्यासक एजाज अस्लमसाहेब, पंजाबी सांझी सभेचे मुंबईचे अध्यक्ष चरणजीत सिंह गौरा, जीवनविद्या मिशनचे प्रबोधक विश्वनाथ कामत व युनायटेड बुद्धिस्ट संघचे डॉ. वेन सुदान यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. एजाज हुसेन म्हणाले, ‘समाजात वावरताना एकमेकांशी आदानप्रदान असणे गरजेचे आहे. कारण त्यामुळे आपण एकमेकांच्या समस्या जाणून त्यावर उपाय सुचवू शकतो. त्यातून मतभेद दूर होऊन प्रेम व सद्भावना निर्माण होऊ शकते. तसेच परिणामी द्वेष व घृणा नाश पावतात. या वेळी कुर्ला विभागातील जमात-ए-इस्लामी हिंदचे विभागप्रमुख हसीब भाटकर, मुंबईचे सचिव हुमायंू शेख यांचे भाषण झाले. सूत्रसंचालन मुज्जफर अन्सारी यांनी केले. शाकीर शेख यांनी आभार मानले. या वेळी प्रवेशद्वारावर इंग्रजी, उर्दू, मराठी व हिंदीमधील फलक लावले होते़एजाज हुसेन म्हणाले, ‘समाजात वावरताना एकमेकांशी आदानप्रदान असणे गरजेचे आहे. कारण त्यामुळे आपण एकमेकांच्या समस्या जाणून त्यावर उपाय सुचवू शकतो. त्यातून मतभेद दूर होऊन प्रेम व सद्भावना निर्माण होऊ शकते. तसेच परिणामी द्वेष व घृणा नाश पावतात.