प्रत्येक विद्यापीठात ‘मेरीटाइम मुंबई अ‍ॅन ओडिसी’ दाखवावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 04:23 AM2019-01-21T04:23:27+5:302019-01-21T04:23:41+5:30

नाविक दलाची महती व मुंबईच्या इतिहासाची ओळख दाखविणाऱ्या ‘मेरीटाईम मुंबई अ‍ॅन ओडिसी’ हा माहितीपट राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये दाखविला जावा.

Every university should show 'Maritime Mumbai an Odyssey' | प्रत्येक विद्यापीठात ‘मेरीटाइम मुंबई अ‍ॅन ओडिसी’ दाखवावा

प्रत्येक विद्यापीठात ‘मेरीटाइम मुंबई अ‍ॅन ओडिसी’ दाखवावा

Next

मुंबई : नाविक दलाची महती व मुंबईच्या इतिहासाची ओळख दाखविणाऱ्या ‘मेरीटाईम मुंबई अ‍ॅन ओडिसी’ हा माहितीपट राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये दाखविला जावा. या माहितीपटातून विद्यार्थ्यांमध्ये जागृती होऊन त्यांना आपल्या नाविक दलाचा गौरवशाली इतिहास समजेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी रविवारी केले.
कुलाबा नेव्हीनगर येथे नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल गिरीश लुथरा यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या माहितीपटाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल बोलत होते. या वेळी राज्यपाल राव यांच्या हस्ते माहितीपटाच्या डीव्हीडीचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार अरविंद सावंत, आमदार राज पुरोहित यांच्यासह नाविक दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यपाल म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सागरी सुरक्षेचे महत्व ओळखून विजयदुर्गसारखे किल्ले निर्माण केले. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यासारखे आरमारप्रमुख तयार करून सागरी किनाºयांचे रक्षण केले.
देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखळी जाणारी मुंबई सर्व धर्मियांना सामावून घेते. या शहराला लाभलेला अथांग समुद्र किनाºयाने वैभवात भर पडली आहे. नाविक दलाला त्यामुळे आपली कामगिरी करण्यास मोठा वाव मिळाला आहे. हा माहितीपट अत्यंत माहितीयुक्त असून याचा लाभ सर्वांना होईल, असे सांगून त्यांनी माहितीपटाच्या निमार्ते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ व संशोधकाचे अभिनंदन केले.
प्रास्ताविकातून व्हाईस अ‍ॅडमिरल गिरीश लुथरा यांनी माहितीपटाची माहिती दिली. या माहितीपटाची निर्मिती इनार कॅपिटलचे चेअरमन श्याम सिंघानिया यांनी तर दिग्दर्शन साकेत बहल यांनी केले आहे. समारंभाला नाविक दलाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Every university should show 'Maritime Mumbai an Odyssey'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.