धावपट्टीवर विमानांसह रोज १५०० किलो कचऱ्याचेही लँडिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 02:39 AM2019-03-29T02:39:59+5:302019-03-29T02:40:36+5:30

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग होणाऱ्या विमानांमुळे दर २४ तासांत धावपट्टीवर तब्बल १५०० ते २ हजार किलो रबराचा कचरा विखुरला जात असल्याचे समोर आले आहे.

 Everyday landing with 1500 kilograms of garbage on the runway | धावपट्टीवर विमानांसह रोज १५०० किलो कचऱ्याचेही लँडिंग

धावपट्टीवर विमानांसह रोज १५०० किलो कचऱ्याचेही लँडिंग

googlenewsNext

मुंबई : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग होणाऱ्या विमानांमुळे दर २४ तासांत धावपट्टीवर तब्बल १५०० ते २ हजार किलो रबराचा कचरा विखुरला जात असल्याचे समोर आले आहे. हा कचरा साफ करण्यासाठी विमानतळ प्रशासनाकडून दररोज पहाटे ३.२० ते ४ वाजेपर्यंत ४० मिनिटे स्वच्छता मोहीम राबवली जाते. दोन धावपट्टींना छेदणाºया भागात विखुरलेल्या या रबराला बाजूला करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
विमान धावपट्टीवर उतरताना त्याचा वेग सुमारे ३०० किमी प्रति तास असतो. धावपट्टीवर जेथे विमान जमिनीला स्पर्श करते त्या टच पॉइंटवर सुमारे ४०० टन वजनाचा भार असतो. त्यामुळे विमानाच्या टायरमधील रबर बाहेर फेकले जाते व ते धावपट्टीवर विखुरले जाते. छोट्या विमानांच्या लँडिंग वेळी किमान तीन किलो, मध्यम आकाराच्या विमानाच्या लँडिगवेळी किमान ८ किलो तर मोठ्या विमानाच्या लँडिगवेळी किमान १५ ते १८ किलो रबर विखुरले जाते. बोइंग ७७७ हे मोठे विमान असल्याने त्याच्या लँडिंगवेळी टच पॉइंटवर मोठा ताण पडतो. त्यामुळे रबर विखुरण्याचे प्रमाण मोठे असते. धावपट्टीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. सध्या मुंबई विमानतळावर दररोज अशा प्रकारच्या १६ विमानांची वाहतूक केली जाते, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने गुरुवारच्या पत्रकार परिषदेत दिली.

६०० कर्मचाऱ्यांकडून दुरुस्ती काम पूर्ण
विमानतळावरील दोन धावपट्टींना छेदणाºया सुमारे ५० हजार चौ.मी. धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम ६०० कर्मचाºयांनी पूर्ण केले आहे. ७ फेब्रुवारीपासून सुरू झालेले हे काम ३० मार्चपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. नियोजनाप्रमाणे ९८ टक्के काम पूर्ण झाले असून शनिवारी उर्वरित काम पूर्ण होईल. यापूर्वी २००९-१० ला धावपट्टी दुरुस्तीचे काम केले होते. आता झालेल्या कामानंतर प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येईल. पुढील किमान ७ ते ८ वर्षे धावपट्टीला धोका राहणार नाही, असा विश्वास विमानतळ प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

Web Title:  Everyday landing with 1500 kilograms of garbage on the runway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.