Join us  

मुंबईत दररोज खड्ड्यांची शंभरी!

By admin | Published: July 29, 2014 1:20 AM

मुसळधार पावसामुळे मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात बळावणारा खड्ड्यांचा रोग यंदा वाढला आहे़ गेल्या तीन दिवसांत दररोज खड्ड्यांनी सरासरी शंभरी गाठली आहे़

शेफाली परब-पंडित, मुंबई मुसळधार पावसामुळे मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात बळावणारा खड्ड्यांचा रोग यंदा वाढला आहे़ गेल्या तीन दिवसांत दररोज खड्ड्यांनी सरासरी शंभरी गाठली आहे़ यामुळे काँक्रिटीकरणामुळे रस्ते चकाचक झाल्याचा शिवसेनेचा दावा पोकळ ठरला आहे़मुंबईचे रस्ते चकाचक करण्यासाठी पालिकेने पंचवार्षिक योजना आणली़ या मास्टर प्लॅनमुळे तीन हजार कोटी खर्च करून मुंबईला खड्ड्यांच्या समस्येतून मुक्तता देण्याचा दावा शिवसेनेने निवडणुकीच्या अजेंड्यातून केला़ या कार्यक्रमाला वर्ष उलटले तरी यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांच्या परीक्षेत पालिका नापास झाली आहे़ १ जूनपासून मुंबईत ३६७२ खड्ड्यांची नोंद झाली आहे़ यामध्ये पालिका आणि शासनाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांचाही समावेश आहे़ (प्रतिनिधी)