लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भारत नको असेल, तर सर्वांनी किमान समान कार्यक्रमावर एकत्र येण्याची गरज आहे. देशाचे संविधान व लोकशाहीचे स्पिरिट वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. सध्याच्या सरकारला विकासाशी देणेघेणे नाही. त्यामुळे या सरकारविरोधात सर्वांनी मिळून लढले पाहिजे, असे प्रतिपादन जेएनयूमधील विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार याने केले.
नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सुरू असलेल्या ‘मुंबई कलेक्टिव’ या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात शनिवारी कन्हैय्या कुमार बोलत होता. भाजपावर टिका करत तो म्हणाला, धर्मांधता विष बनत असून, फॅसिस्ट शक्तींनी हिंसा सामान्य केली आहे. अत्याचाराचे घटना पाहूनदेखील लोक पेटून उठत नाहीत. म्हणून आपणच आपल्याला घालून दिलेल्या मर्यादेतून बाहेर पडायला हवे. आपण कोणत्याही विचारधारेचे असलो तरी आपल्यात एकता निर्माण झाली पाहिजे. , त्यासाठी आपण एका मंचावर यायला पाहिजे. रोहित वेमुला गेल्यावर किंवा काही तरी घडल्यावरच आपण जागे होता कामा नये, असे कन्हैय्या कुमार म्हणाला.