मुंबईत आलात तर सगळे मरतील'; चेन्नई-मुंबई विमानाच्या शौचालयात धमकीचे पत्र; विमानतळ पोलिसांकडून तपास सुरू
By गौरी टेंबकर | Published: February 14, 2024 12:25 AM2024-02-14T00:25:55+5:302024-02-14T00:27:21+5:30
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लँडिंगच्या काही मिनिटांपूर्वी एका क्रूला शौचालयात टिश्यू पेपर सापडला. त्यावर लिहिलेल्या संदेशासह. 'मुंबईत आलात तर सगळे मरतील' असा संदेश लिहिला आहे.
मुंबई: चेन्नई-मुंबई इंडिगो फ्लाईटच्या प्रसाधनगृहात मंगळवारी सकाळी धमकीचे पत्र टाकणाऱ्या व्यक्तीचा मुंबई विमानतळ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी शोध सुरू केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लँडिंगच्या काही मिनिटांपूर्वी एका क्रूला शौचालयात टिश्यू पेपर सापडला. त्यावर लिहिलेल्या संदेशासह. 'मुंबईत आलात तर सगळे मरतील' असा संदेश लिहिला आहे.
क्रूने कॅप्टनला अलर्ट केल्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलला (एटीसी) माहिती देण्यात आली. विमानाला विमानतळावरील एका वेगळ्या विभागात नेल्यानंतर अलर्ट वाजवण्यात आला आणि सर्व प्रवासी आणि संपूर्ण विमानाचा शोध घेण्यात आला. परंतु, कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळली नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिसांनी सांगितले की त्यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ५०५ (सार्वजनिक उपद्रव घडवून आणणारी विधाने) नुसार गुन्हा दाखल केला आहे आणि पत्र सोडलेल्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. प्रवासादरम्यान कोणत्याही प्रवाशाने असामान्य किंवा संशयास्पद वर्तन करताना पाहिले आहे का हे तपासण्यासाठी फ्लाइट क्रूचीकडेही चौकशी केली जाईल.