नोंदवलेली साक्ष बनावट असल्याचा दावा

By admin | Published: February 23, 2016 01:12 AM2016-02-23T01:12:24+5:302016-02-23T01:12:24+5:30

सुरज परमार यांचे स्रेही वल्लभ मजेठिया यांनी पोलिसांकडे नोंदवलेली साक्षच बनावट असल्याचा दावा सुधाकर चव्हाण यांचे वकील हेमंत सावंत यांनी जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही.व्ही. बांबर्डे

The evidence claimed is fake | नोंदवलेली साक्ष बनावट असल्याचा दावा

नोंदवलेली साक्ष बनावट असल्याचा दावा

Next

- जितेंद्र कालेकर,  ठाणे
सुरज परमार यांचे स्रेही वल्लभ मजेठिया यांनी पोलिसांकडे नोंदवलेली साक्षच बनावट असल्याचा दावा सुधाकर चव्हाण यांचे वकील हेमंत सावंत यांनी जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही.व्ही. बांबर्डे यांच्या न्यायालयात केला आहे. नरेश म्हस्के आणि जितेंद्र आव्हाड यांना यात गोवण्यासाठी त्यांची नावे मजेठियांकडून वदवून घेण्याचा प्रकार पोलिसांनी केल्याचा दावाही सावंत यांनी केला.
नगरसेवक चव्हाण यांच्या जामीन अर्जावर सावंत यांनी सोमवारी साडेतीन तास युक्तिवाद केला. त्या वेळी त्यांनी अनेक बाबींकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. ते म्हणाले, विक्रांत चव्हाण, सुधाकर चव्हाण, हणमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला हे चार नगरसेवक आपल्याकडे पैसे मागतात, असे परमार यांनी सांगितल्याचा जबाब मजेठियांनी पोलिसांकडे नोंदविला आहे. तसेच ‘पोटल्या’ अर्थात नरेश म्हस्के
आणि ‘घाऱ्या’ अर्थात जितेंद्र आव्हाड हेही त्रास देत असल्याचे परमार
यांनी सांगितल्याचे मजेठियांनी म्हटले आहे.
पण, ‘घाऱ्या’ म्हणजे आव्हाडच आणि ‘पोटल्या’ म्हणजे म्हस्केच हे त्यांनी कसे काय ताडले? या दोघांचाही परमार यांच्या ‘सुसाइड नोट’मध्ये कुठेही उल्लेख नाही. मजेठियांचे पोलीस रेकॉर्ड
तपासावे. त्यांची संपूर्ण साक्षच खोटी आहे.

म्हस्केंना राजकारणातून संपवण्यासाठी मोठे षड्यंंत्र रचल्याचा दावाही त्यांनी केला. म्हस्के, आव्हाड किंवा या चौघांनी जर परमार यांच्याकडे पैसे मागितले होते, तर त्यांच्याविरुद्ध परमार यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला असता, असेही ते म्हणाले.

Web Title: The evidence claimed is fake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.