ईडब्ल्यूएस घोळ, निकाल लटकला; आमच्यावरच अन्याय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 06:34 AM2023-09-10T06:34:47+5:302023-09-10T06:35:23+5:30

पोलिस उपनिरीक्षक परीक्षा : आमच्यावरच अन्याय का?

EWS mess, results hang | ईडब्ल्यूएस घोळ, निकाल लटकला; आमच्यावरच अन्याय का?

ईडब्ल्यूएस घोळ, निकाल लटकला; आमच्यावरच अन्याय का?

googlenewsNext

पोपट पवार

कोल्हापूर :  पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत ‘ईडब्ल्यूएस’चा घोळात  मराठा समाजातील ६५ उमेदवारांचा निकाल लटकला आहे. त्यामुळे उमेदवार सैरभैर झाले आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०२० मध्ये ६५० जागांसाठी परीक्षा घेण्यात आली. यामध्ये ‘एसईबीसी’साठी राखीव जागा होत्या. याच वेळी मराठा आरक्षणाचा निर्णय सरकारने घेतला. ईडब्ल्यूएस प्रवर्ग खुला करून देण्यात आला. या पदासाठीचे सर्व टप्पे ईडब्ल्यूएस प्रवर्गातून पार पडले. मात्र, आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील आरक्षणाचे प्रकरण न्यायालयात गेले. त्याचा संदर्भ घेत आयोगाने तीन वर्षे या परीक्षेचा निकाल प्रलंबित ठेवला. इतर समाजातील विद्यार्थ्यांनी आवाज उठवताच सरकारने जुलै २०२३ मध्ये मराठा समाजातील ६५ उमेदवार वगळून इतर ५८५ उमेदवारांचा निकाल जाहीर केला. 

पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, शारीरिक चाचणी, मुलाखत हे सर्व टप्पे यशस्वीरीत्या पार पाडले. गुणवत्ता असूनही ६५ उमेदवारांना वगळून निकाल लागत असेल तर हा अन्याय आहे. 
- प्रियांका खाडे, कोल्हापूर

अजूनही प्रतीक्षाच
निवडलेल्यांना प्रशिक्षणासाठी पाठविले. एकाच वेळी परीक्षा देऊनही मराठा समाजातील ६५ उमेदवार अद्यापही निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.
 

Web Title: EWS mess, results hang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.