Join us

पोलिस भरतीत धावताना माजी सैनिकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 9:25 AM

Police Recruitment: पोलिस भरतीसाठी धावताना कोसळून माजी सैनिक सचिन कदम (४२) यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी बीकेसी पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

मुंबई/खेड : पोलिस भरतीसाठी धावताना कोसळून माजी सैनिक सचिन कदम (४२) यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी बीकेसी पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मूळचे खेड तालुक्यातील दहिवली येथील रहिवासी असलेले सचिन कदम हे लष्करातून २०११ मध्ये निवृत्त झाले होते. त्यानंतर टोरेंटो इलेक्ट्रिक पॉवरमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करत हाेते. पोलिस भरतीसाठी कालिना येथील मुंबई विद्यापीठ परिसरात मैदानी चाचणीसाठी ते आले. १६०० मीटर धावण्यासाठी ते उतरले हाेते. मात्र, तिसऱ्या फेरीत जमिनीवर कोसळले. त्यांना तत्काळ व्ही. एन. देसाई रुग्णालयात नेले.  तेथे दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. 

अद्याप शवविच्छेदन अहवाल मिळालेला नाही. अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. अधिक  तपास सुरू आहे.- दीक्षित गेडाम, पोलिस उपायुक्त, परिमंडळ ८

कल्याणमध्ये अंत्यसंस्कारसचिन कदम यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व आई असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर कल्याण येथील स्मशानभूमीत सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :पोलिसभारतीय जवान