आझाद मैदानात माजी सैनिक झाडावर चढला, सरकारला करतोय विनंती; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 01:29 PM2022-01-10T13:29:08+5:302022-01-10T13:29:41+5:30
या माजी सैनिकाचे नाव प्रकाश आबा वाघमारे अस आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते आपल्या गावाकडच्या सूतगिरणी विषयी विविध मागण्या घेऊन आंदोलनाला बसले आहेत.
मुंबई - आझाद मैदानात एक माजी सैनिक झाडावर चढून संताप व्यक्त करत आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी हा माजी सैनिक आझाद मैदानात बसलेलो आहे. मात्र त्याची कोणत्याही संबंधित अधिकाऱ्यांची व प्रशासनाची भेट होत नसल्याने आज तो चक्क झाडावर चढला आहे.
या माजी सैनिकाचे नाव प्रकाश आबा वाघमारे अस आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते आपल्या गावाकडच्या सूतगिरणी विषयी विविध मागण्या घेऊन आंदोलनाला बसले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते आझाद मैदानात आंदोलन करत आहेत .मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आज ते थेट दहाच्या सुमारास आझाद मैदानातील झाडावर चढले .दोन तास पोलीस माजी सैनिकाना विनंती करून खाली बोलावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सैनिक आपल्या मागणीवर ठाम आहेत त्यामुळे पोलिस आणि अग्निशमन दलाला संपर्क साधला अग्निशामक दल घटनास्थळी आला आहे व त्या व्यक्तीला झाडावरून खाली घेण्याचा प्रयत्न करत आहेत.