Join us

परीक्षा रद्दचा फेरविचार करावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 4:05 AM

मुंबई : दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) फेरविचार करावा, अशी मागणी केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. ...

मुंबई : दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) फेरविचार करावा, अशी मागणी केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडे करण्यात आली. परीक्षा रद्द करून, उत्तीर्ण करणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी, शिक्षणव्यवस्थेसाठी आणि समाजासाठी घातक असल्याचा मुद्दा अभ्यासक धनंजय कुलकर्णी यांनी मांडला.

...........................

विज्ञान पुस्तकाला पुरस्कार जाहीर

मुंबई : मराठीतील विज्ञानविषयक उत्तम पुस्तकाला मराठी विज्ञान परिषदेतर्फे पारितोषिक देण्याची योजना यंदापासून सुरू झाली. डॉ. माधव गाडगीळ यांच्या उत्क्रांती : एक महानाट्य (राजहंस प्रकाशन) यास यावर्षीचे पारितोषिक जाहीर झाले. पारितोषिक वितरण २५ एप्रिल रोजी दूरदृष्य माध्यमाद्वारे होईल.

..........................................

परळ येथे परिचारिकांचा शपथविधी

मुंबई : परळ येथील महात्मा गांधी स्मारक रुग्णालय परिचारिका प्रशिक्षण केंद्राचा दीप प्रज्वलन व शपथविधी सोहळा नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर किशोरी पेडणेकर या दूरस्थप्रक्षेपणाद्वारे उपस्थित होत्या. यावेळी सर जे. जे. रुग्णालयाच्या माजी अधीक्षिका शोभा चास्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली आदी उपस्थित होते.

...................................

कृषी क्षेत्रासाठी पुरस्कार जाहीर

मुंबई : प्रा. प्रतीक देशमुख, अमरावती (शंख किडींचे निर्मूलन) यांना मराठी विज्ञान परिषदेचा वसंतराव नाईक कृषी पुरस्कार, तर दिशांतर संस्था, चिपळूण (महिलांच्या नेतृत्त्वाखाली शेती) यांना बळीराजा-अण्णासाहेब शिंदे पुरस्कार जाहीर झाला. राजेंद्र आत्माराम नलावडे, औरंगाबाद (पर्यावरणस्नेही शेती) यांची निवड मराठी विज्ञान परिषद - ज्योती चापके पुरस्कारासाठी झाली.

............................................