...तर प्रश्नपत्रिकाही घेणार, आजपासून बी.कॉमची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 06:05 AM2017-11-20T06:05:12+5:302017-11-20T06:05:34+5:30

मुंबई विद्यापीठाच्या मार्च-एप्रिल महिन्याच्या परीक्षेच्या गोंधळानंतर आता सोमवार, २० नोव्हेंबरपासून टीवाय बी.कॉमच्या पाचव्या सत्राच्या परीक्षा सुरू होणार आहेत.

Examination of B.Com from today, will take the question papers | ...तर प्रश्नपत्रिकाही घेणार, आजपासून बी.कॉमची परीक्षा

...तर प्रश्नपत्रिकाही घेणार, आजपासून बी.कॉमची परीक्षा

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या मार्च-एप्रिल महिन्याच्या परीक्षेच्या गोंधळानंतर आता सोमवार, २० नोव्हेंबरपासून टीवाय बी.कॉमच्या पाचव्या सत्राच्या परीक्षा सुरू होणार आहेत. बी.कॉमच्या परीक्षेला अधिक विद्यार्थी बसतात, त्यामुळे पेपरफुटी प्रकरणाला आळा बसण्यासाठी विद्यापीठाने महाविद्यालयांना आदेश दिले आहेत. यानुसार, परीक्षा सुरू झाल्यापासून विद्यार्थी अर्ध्या तासाच्या आत बाहेर पडल्यास त्या विद्यार्थ्याकडून प्रश्नपत्रिका काढून घेतली जाणार आहे.
सोमवारपासून सुरू होणाºया बी.कॉमच्या परीक्षेला तब्बल ७८ हजार ३५३ विद्यार्थी बसणार आहेत. ही परीक्षा २६३ केंद्रांवर घेतली जाणार आहे. या परीक्षेदरम्यान अडथळे येऊ नयेत म्हणून महाविद्यालयांना विशेष सूचना दिल्या आहेत. २५ एप्रिल २०१६ च्या परिपत्रकानुसार परीक्षा सुरू झाल्यानंतर एक तासानंतरच परीक्षा केंद्रातून विद्यार्थ्यांना बाहेर जाऊ द्यावे. अथवा एखाद्या विद्यार्थ्याला अर्ध्या तासानंतर परीक्षा केंद्रातून बाहेर पडायचे असेल, तर त्या विद्यार्थ्याकडून उत्तरपत्रिकेसह प्रश्नपत्रिकादेखील जमा करून घ्यावी. प्रश्नपत्रिका समाज माध्यमांवर कोणासही संदेशित करता येणार नाहीत. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य व माहिती तंत्रज्ञान समन्वयक यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिकेची गोपनीयता व सुरक्षितता याची काळजी घ्यावी, अशा प्रकारच्या सूचना परीक्षा व मूल्यमापनाच्या संचालकांनी पाठविल्या आहेत. या परीक्षेसाठी सुरुवातीपासूनच विशेष दक्षता घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. व्ही.एन. मगरे यांनी सांगितले.
>विद्यापीठाचा विद्यार्थ्यांसाठी व्हिडीओ
पाचव्या सत्राच्या परीक्षांचे मूल्यांकन आॅनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी क्यूपी कोड व सीट क्रमांक योग्य पद्धतीने कसा भरावा, याविषयी माहिती सांगणारा व्हिडीओ विद्यापीठाने तयार केला आहे. सोशल साइट्सच्या माध्यमातून हा व्हिडीओ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला आहे.

Web Title: Examination of B.Com from today, will take the question papers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.