मुंबई : जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होत्या, पण कोरेगाव भीमा घटनेचे हिंसक पडसाद २ जानेवारीला दुपारी मुंबईत उमटले. त्यामुळे दुपारच्या सत्रात असलेल्या पेपरला विद्यार्थ्यांना पोहोचणे शक्य झाले नाही. त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षापुन्हा घेऊ, असे मुंबई विद्यापीठाने म्हटले होते. त्यानुसार या परीक्षा आता २० जानेवारी रोजी आधीच्या वेळापत्रकातील वेळेनुसार घेण्यात येणार आहेत.२ जानेवारीला महाराष्टÑ बंदच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला जाणे शक्य झाले नाही. त्यांच्यासाठी २० जानेवारीला सांताक्रुझ कॅम्पसमधील आयडॉल इमारतीतील डॉ. शंकर दयालशर्मा भवन येथे परीक्षा होईल. २० जानेवारीला दुपारी ३ वाजता या परीक्षा होतील. टी.वाय.बी.ए., एम.एड. (स्पेशल एज्युकेशन - सत्र १), एम. ए. (पार्ट १, २), बी.कॉम. (सेमिस्टर ६), एम.कॉम. पार्ट२, टी.वाय.बी.एससी, बी.एस.सी.आयटी, एम.सी.ए (सेमिस्टर ३), एल.एल.बी. (तीन वर्षांचा अभ्यासक्रम) या अभ्यासक्रमांसाठी ही परीक्षा असेल.
‘त्या’ विद्यार्थ्यांची २० जानेवारीला परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 4:25 AM