- सचिन लुंगसेमुंबई : वातावरणातील बदलाचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम तपासण्यासाठी राज्यात नियामक मंडळ आणि कार्यदलाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून राज्याचा कृती आराखडा तयार केला जाणार असून, त्यानुसार उपाययोजना केल्या जाणार आहेत.वातावरणातील बदल आणि मानवी आरोग्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासनाने मंजजुरी दिली असून सार्वजनिक आरोग्य विभागाने यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे.राज्यस्तरीय गव्हर्निंग बॉडी (नियामक मंडळ), टास्क फोर्स (कार्यदल)च्या रचनेनुसार, आरोग्यमंत्री हे अध्यक्ष असतील. आरोग्य खात्याचे प्रधान सचिव उपाध्यक्ष, आरोग्य सेवा प्रमुख सदस्य सचिव, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागाचे आयुक्त आणि आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे विभागीय संचालक हे सदस्य असणार आहेत. शिवाय प्रत्येक जिल्हा स्तरावर नोडल अधिकारी निवडण्यात येणार असून, जिल्हा पर्यावरण आरोग्य कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे.राज्य पातळीवरील कक्षाप्रमाणेच जिल्हा पर्यावरणीय कक्षाची रचना असेल. यासंदर्भातील कार्यवाहीसाठी यात सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा साथरोगतज्ज्ञांचा समावेश असणार आहे.कार्यदलाचे कार्यकृती आराखड्याची अंमलबजावणी करणे, वातावरणातील बदलाचा परिणाम व होणारे आजार ओळखणे, अशा आजारांचे सर्वेक्षण करून जोखीम निश्चित करणे, जोखीमग्रस्त भाग व लोकसंख्या निश्चित करून त्यानुसार योजना आखणे, उपलब्ध संसाधनाची यादी करणे, जबाबदार व्यक्ती किंवा संस्थांची यादी करीत त्यांची भूमिका निश्चित करणे, विविध विभाग आणि नागरिक संस्था यामध्ये समन्वय स्थापन करणे.कधी होणार बैठक : राज्यस्तरीय गव्हर्निंग बॉडीची बैठक वर्षातून एक वेळा, तर टास्क फोर्सची बैठक वर्षातून तीन वेळा होईल.जीवसृष्टीपेक्षा दुसरे महत्त्वाचे काहीच नाहीभौतिक विकासामुळेच मानवजात व जीवसृष्टीचे पृथ्वीवरून उच्चाटन सुरू झाले आहे. मानवजात व जीवसृष्टी वाचवण्यापेक्षा दुसरे महत्त्वाचे काहीच असू शकत नाही. आर्थिक राजकीय दृष्टिकोनही चूक आहे. तो पृथ्वी व जीवनकेंद्री असायला हवा, तरच सत्याचे आकलन होईल. औद्योगिकीकरण व शहरीकरण विसर्जित करण्याची प्रक्रिया तत्काळ सरू व्हायला पाहिजे. आपणास पृथ्वी जगवते, अस्तित्व देते, औद्योगिकीकरण व अर्थव्यवस्था नाही. प्रचलित विकास पृथ्वीची जीवनाची क्षमता रोज नष्ट करीत आहे. - अॅड. गिरीश राऊत, पर्यावरणतज्ज्ञआजारांत वाढकधी ऊन, कधी पाऊस, असे वातावरण बदलत आहे. अशा वातावरणात डासांमुळे होणाऱ्या डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांचे प्रमाण वाढताना दिसते. जोरदार पाऊस झाला, तर परिस्थिती बदलते; परंतु मराठवाड्यात असा पाऊस दिसत नाही. दूषित पाण्यामुळे जलजन्य आजारही वाढतात.- डॉ. सत्यनारायण सोमाणी, अध्यक्ष,इंडियन मेडिकल असोसिएशन, औरंगाबाद
वातावरण बदलाचा आरोग्यावरील परिणाम तपासणार; राज्यात नियामक मंडळ आणि कार्यदलाची स्थापना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 12:56 AM