नीट परीक्षा सोशल मीडियावर होतेय ट्रेंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:09 AM2021-08-20T04:09:18+5:302021-08-20T04:09:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी नॅशनल एलिजिबीलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट फॉर अंडरग्रॅज्युएट (नीट) या ...

Exams are a trend on social media | नीट परीक्षा सोशल मीडियावर होतेय ट्रेंड

नीट परीक्षा सोशल मीडियावर होतेय ट्रेंड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी नॅशनल एलिजिबीलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट फॉर अंडरग्रॅज्युएट (नीट) या परीक्षेसोबत सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांची श्रेणीसुधार आणि पुरवणी परीक्षा २५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत होणार आहेत. विद्यार्थ्यांची यावेळी धावपळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर तक्रारींचा सूर लावला आहे आणि परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. नीट ही परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. यासाठी सोशल मीडियावर #PostponeNEETUG हा ट्रेंड विद्यार्थी, पालकांनी सुरू केला आहे.

पालकांमधूनही याबद्दल तक्रारींचा सूर उमटला असून, पालक संघटनाही परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी करत आहेत. इंडिया वाईड पॅरेंट्स असोसिएशनने नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी एनटीएकडे केली आहे. केंद्र सरकारलाही याविषयी पत्र पाठवले आहे. १२ सप्टेंबरला नीट परीक्षा होणार आहे. या परीक्षेदरम्यानच सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांची श्रेणीसुधार आणि पुरवणी परीक्षा होणार आहे. सीबीएसई बोर्डाचे अनेक विद्यार्थी नीट परीक्षा देणार आहेत. नीट परीक्षेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १३ सप्टेंबरला सीबीएसई बारावीची गणिताची परीक्षा आहे. अनेक विद्यार्थी नीट बरोबरच यातील परीक्षाही देणार असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळत नाही. तसेच एका परीक्षा केंद्रातून अन्य परीक्षेच्या केंद्रावर जाण्यासाठीदेखील विद्यार्थ्यांना अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थी हित लक्षात घेता केंद्र सरकारने नीट परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी पॅरेंट्स असोसिएशनच्या अध्यक्ष ॲड. अनुभा सहाय यांनी केली आहे.

आणखी काही परीक्षा नीट परीक्षेच्या आसपास

अन्य राज्यस्तरीय प्रवेश परीक्षाही नीट परीक्षांच्या तारखेच्या आसपासच होणार आहे. महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (एमएच-सीईटी) बरोबरच कर्नाटकची CoMEDK परीक्षा १४ सप्टेंबर रोजी आहे. तर ओडिशा जेईई आणि मध्य प्रदेशच्या बारावीच्या श्रेणीसुधार परीक्षादेखील नीट परीक्षेदरम्यान होणार आहेत. राष्ट्रीय स्तरावर बीएसस्सी प्रवेशासाठी होणारी ICAR AIEEA २०२१ ही परीक्षा ७, ८,१३ सप्टेंबरला आहे.

Web Title: Exams are a trend on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.