राज्यसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जादू सर्वांनी पाहिली. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची मत फोडत फडणवीस यांनी भाजपचा उमेदवार जिंकून आणला. नेमकी कोणत्या पक्षाची मत फोडली हे अजुनही समोर आलेले नाही. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'राज्यसभा निवडणुकीत फुटलेली मत ही शिंदे गटाची नव्हती, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला. त्यामुळे आता ही मत नेमकी कोणत्या पक्षाची होती, यावरुन चर्चा सुरू झाल्या आहेत.
राज्यसभा निवडणुकीवेळी भाजपचे संख्याबळ नसतानाही भाजपने उमेदवार निवडून आणला. यावेळी भाजपला महाविकास आघाडीतील आमदारांनी मत दिल्याच्या चर्चा सुरू होत्या. यानंतर काही दिवसांनी शिवसेनेतून ४० आमदार बाहेर पडत वेगळा गट स्थापन करुन भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यामुळे शिंदे गटानेच त्यावेळी भाजपला मत दिल्याची चर्चा सुरू झाली, पण आता या चर्चांना काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम देत शिंदे गटाने मत दिली नसल्याचे म्हटले आहे.
राज्यसभा निवडणुकीत शिंदे गटाने भापला मत दिली अशी चर्चा होती. पण, आता फडणवीस यांनी शिंदे गटाने त्यावेळी मत दिली नव्हती असं वक्तव्य केले आहे, त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे भाजपला नेमकी कोणत्या पक्षाच्या आमदारांनी मत दिली, या चर्चां सुरू आहेत. तर काही दिवसापासूनकाँग्रेसचे आमदार फुटणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीही या संदर्भात एक वक्तव्य केले.
भारत जोडोच्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत महाराष्ट्रातच काँग्रेसचे दोन गट पडतील
काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा महाराष्ट्रात येणार असून, यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसचेही (Congress) आमदार फुटणार असल्याचे वक्तव्य केले होते. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. आरोप प्रत्यारोप झाले. या पार्श्वभूमिवर काल भाजपचे (BJP) नेते आमदार आशिष शेलार यांनीही एका मुलाखतीदरम्यान काँग्रेसचे दोन टप्पे पडतील असं वक्तव्य केले आहे, त्यामुळे आता काँग्रेसचेही आमदार फुटणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
एका वृत्तवाहिनेची मुलाखतीवेळी आमदार आशिष शेलार यांनी हे वक्तव्य केले. भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत काँग्रेसचे दोन टप्पे पडतील असा गौप्यस्फोट आमदार आशिष शेलार यांनी केला. यात्रेतील पहिल्या टप्प्यातील नेते दुसऱ्या टप्प्यात दिसणार नाहीत. दुसऱ्या टप्प्या पर्यंत काँग्रेसमध्येच दोन टप्पेच पडतील. जे पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात नेतृत्व करत आहेत. ते दुसऱ्या टप्प्यात कोणत्या पक्षात असणार हे पाहाच, असंही आशिष शेलार म्हणाले.