Join us  

अति. मुख्य सचिवपदी परदेशी

By admin | Published: January 03, 2017 4:58 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांना अतिरिक्त मुख्य सचिवपदी बढती देण्यात आली आहे. १९९२ च्या तुकडीच्या सहा अधिकाऱ्यांना प्रधान सचिवपदी बढती देण्यात आली आहे.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांना अतिरिक्त मुख्य सचिवपदी बढती देण्यात आली आहे. १९९२ च्या तुकडीच्या सहा अधिकाऱ्यांना प्रधान सचिवपदी बढती देण्यात आली आहे. परदेशी हे १९८५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. अतिरिक्त मुख्य सचिव मालिनी शंकर या महासंचालक; जहाजबांधणी या पदावर केंद्रात बदलून गेल्यानंतर रिक्त झालेल्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी परदेशी यांना संधी मिळाली आहे. ते मुख्यमंत्री कार्यालयातच कार्यरत असतील, पण आता त्यांचे पद अतिरिक्त मुख्य सचिव असे असेल. मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर, नगरविकास विभागाच्या (२) सचिव मनीषा म्हैसकर, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव सेठी आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव राजगोपाल देवरा, सध्या केंद्रामध्ये प्रतिनियुक्तीवर असलेले ओ.पी. गुप्ता आणि विमलेंद्र शरण या सर्वांना सचिवपदावरून प्रधान सचिव म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. हे सर्व १९९२ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. (विशेष प्रतिनिधी)