Join us

मर्यादेपेक्षा जास्त पेनकिलर्स औषधांचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 4:06 AM

कन्सल्टंट गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि फिजीशियन, डॉ. तेहसिन पेटीवाला म्हणाले की, स्टमक (गॅस्ट्रिक) अल्सर्स पोटातील अस्तरांमध्ये ब्रेक्स असतात. लहान ब्रेक्सला इरोशन्स ...

कन्सल्टंट गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि फिजीशियन, डॉ. तेहसिन पेटीवाला म्हणाले की, स्टमक (गॅस्ट्रिक) अल्सर्स पोटातील अस्तरांमध्ये ब्रेक्स असतात. लहान ब्रेक्सला इरोशन्स म्हणतात आणि मोठ्याला अल्सर म्हणतात. पेप्टिक अल्सर डिसीझ (PUD) मध्ये पोट आणि ड्युओडेनमध्ये उपस्थित अल्सर्सचा समावेश असतो. एस्पिरिनचा समावेश असलेले पेन किलर्समुळे पोटातील अस्तरातील एक जिवाणू संसर्ग होऊन ॲसिडचे वाढीव उत्पादन होते आणि परिणामी पीयूडी होते.

पीयूडीची सर्वात सामान्य परंतु भीतिदायक कॉम्प्लिकेशन म्हणजे रक्तरंजित किंवा कॉफी ग्राउंड रंगाच्या उलट्या, काळ्या रंगाच्या लूझ मोशन्स आणि चक्कर येते. छिद्र पाडण्याच्या गंभीर प्रकरणांमुळे सर्जिकल ट्रीटमेंट करावी लागू शकते आणि वेळेवर व्यवस्थापन न झाल्यास मृत्यू होऊ शकतो. एकूणच दीर्घकाळात, उपचार न केलेल्या अल्सर्समुळे शरीरावर परिणाम होतो, ज्यामुळे अन्न खाण्याचे प्रमाण कमी होते, त्यानंतर वजन कमी होते, ॲनेमिया होतो आणि एकूणच मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. शिवाय, वरील कॉम्प्लिकेशन होण्याचा धोका पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणि मृत्यूसाठी धोका आहे.

ग्लोबल हॉस्पिटलचे सीनियर कन्सल्टंट हेपॅटोलॉजिस्ट डॉ. आकाश शुक्ला म्हणाले की, पूर्व-अस्तित्वातील लिव्हरचा आजार किंवा अल्कोहोलचे सेवन करणाऱ्या ऍसिम्पटोमॅटिक व्यक्तींमध्ये लिव्हर फेलियर होण्याची अधिक शक्यता असते. आयब्युफेनॅकसारख्या कित्येक पेन किलर्स बाजारातून काढून घेण्यात आले आहेत, कारण यामुळे विशेषत: मुलांमध्ये लिव्हर इंज्युरी होते. प्रमाणापेक्षा जास्त पॅरासिटामॉलमुळे नियमितपणे जास्त अल्कोहोल घेणाऱ्या रुग्णांमध्ये लिव्हरलाइजा होऊ शकते किंवा ज्यांना लिव्हर सिरोसिस आहे, त्यांनी खूप जास्त प्रमाणात सेवन केले तर लिव्हर फेलियर होऊ शकतो. अनेक देशांमध्ये निमेस्युलाईड (Nimesulide)वर विशेषत: मुलांमध्ये लिव्हर फेलियर होण्याच्या वाढत्या धोक्यामुळे बंदी आहे.