Join us

मुंबई पोलीस दलात अदलाबदल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 2:50 AM

मुंबई : मुंबई पोलीस दलात बुधवारी मोठी अदलाबदल करण्यात आली. पोलीस ठाण्याच्या जबाबदारीसह १११ साहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस ...

मुंबई : मुंबई पोलीस दलात बुधवारी मोठी अदलाबदल करण्यात आली. पोलीस ठाण्याच्या जबाबदारीसह १११ साहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नेमणूक करीत त्यांच्या खांद्यावर नवीन जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यात ९ रणरागिणींकडे मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेसह महत्त्वपूर्ण पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेचे स.पो. आयुक्त बाळासाहेब काकड यांची चेंबूर विभाग, तर सशस्त्र पोलीस दलातील सपोआ सुहास पाटीलयांची दहिसर विभागाच्या सपोआ पदावर बदली करण्यात आली आहे. गुन्हे अन्वेषण विभागातून मुंबईत बदली झालेल्या सपोआ कुंडलीक निगडे यांना घाटकोपर विभागाची जबाबदारी देण्यात आली असून, अमरावतीतून बदली होऊन आलेल्या सपोआ रवींद्र पाटील यांची सशस्त्र पोलीस विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. यांच्यासह बदली आणि बढती झालेल्या १८ जणांना साहाय्यक पोलीस आयुक्तांचा पदभार सोपविण्यात आला आहे.

५४ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची पोलीस ठाणे बदलून त्यांना नवीन पोलीस ठाण्याचा पदभार सोपविण्यात आला आहे. यात, ९ महिलांचा समावेश आहे. यामध्ये वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश अनावकर, ओशिवराचे शैलेंद्र पासलवाड, वर्सोवाचे रवींद्र बडगुजर, अ‍ॅण्टॉप हीलचे राजेश वाव्हळ आणि एमआयडीचे नितीन अलकनुरे यांची विविध कारणास्तव सशस्त्र पोलीस दलात रवानगी करण्यात आली आहे. तर ठाणे, पुणे, येथून बदली होऊन मुंबईत आलेल्या ९ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचीही नेमणूक करण्यात आली आहे. तसेच ३० पोलीस निरीक्षकांना बढती देत, त्यांनाही पदभार सोपविण्यात आलाआहे. 

टॅग्स :मुंबईपोलिस