अबकारी कर वसुलीत इन्स्पेक्टर राज नाही

By admin | Published: March 16, 2016 08:38 AM2016-03-16T08:38:11+5:302016-03-16T08:38:11+5:30

दागिन्यांवर लादण्यात आलेल्या अबकारी कराबाबतीत गैरसमज दूर करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाचे मुंबई मुख्य आयुक्त सुभाष वर्श्नेय यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली

Excise tax collection inspector is not a king | अबकारी कर वसुलीत इन्स्पेक्टर राज नाही

अबकारी कर वसुलीत इन्स्पेक्टर राज नाही

Next

मुंबई : दागिन्यांवर लादण्यात आलेल्या अबकारी कराबाबतीत गैरसमज दूर करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाचे मुंबई मुख्य आयुक्त सुभाष वर्श्नेय यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. या करात अधिक पारदर्शकता असल्याचे सांगत कोणत्याही प्रकारे इन्स्पेक्टर राज येणार नसल्याचा खुलासा त्यांनी केला.
वर्श्नेय म्हणाले की, मुळात १२ कोटींची मर्यादा घालून प्रशासनाने छोट्या सराफांची या करातून मुक्तता केलेली आहे. या करासंदर्भात चुकीची माहिती दिली जात आहे. कारागीर किंवा छोटे सराफ यांकडून कर वसूल केला जाणार नसला, तरी मोठ्या व्यापाऱ्यांना नोंदणी आणि कर भरण्यासाठी आॅनलाइन पद्धतीचा वापर करावा लागणार आहे. परिणामी, अधिकाऱ्यांसोबत त्यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसेल. इतकेच नव्हे, तर सराफांच्या कारखान्यात कोणत्याही अधिकाऱ्याने जाऊ नये, अशा सूचना विभागाने सर्व अधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सराफांच्या संघटनेसोबत चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. सुमारे ९० टक्के प्रश्न सोडवण्यात प्रशासनाला यश आले असून, कर भरणा प्रक्रियेतील काही अडचणींवर चर्चा सुरू
आहे, असेही ते म्हणाले. परिणामी, लवकरच उरलेल्या अडचणी सोडवून कर वसुलीस
सुरुवात होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

नव्या सूचनांनुसार...
- उत्पादन शुल्क प्रत्येक महिन्याला भरावे लागेल. मार्च २०१६ च्या शुल्काचा भरणा ३१ मार्चपर्यंत करावा.
- चांदीच्या दागिन्यांवर
लेवी लागणार नाही.
- नोंदणी करण्यासाठी सोप्या आॅनलाइन पद्धतीचा वापर करता येईल.
- शिल्पकार, सुवर्णकार आणि जॉब वर्करना नोंदणी करण्याची आवश्यकता नाही; उत्पादन शुल्क किंवा रिटर्नही भरण्याची गरज नाही. ही सर्व जबाबदारी मुख्य निर्मात्यावर असेल.
- गेल्या वर्षी १२ कोटींहून अधिक रुपयांचे उत्पादन असलेल्या सराफांना पहिल्या महिन्यापासून कर भरावा लागेल. गेल्या वर्षी १२ कोटींहून कमी उत्पादन असलेल्या सराफांना यावर्षी सहा कोटी रुपयांपर्यंत कोणत्याही प्रकारचा करभरणा करावा लागणार नाही. ६ कोटी रुपयांच्या उत्पादनानंतर मात्र त्यांना कर भरावा लागेल.

Web Title: Excise tax collection inspector is not a king

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.