Exclusive: ...म्हणून महाराष्ट्रात मोदींच्या एवढ्या सभा घेतल्या; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं (राज)कारण

By यदू जोशी | Published: October 19, 2019 10:44 AM2019-10-19T10:44:51+5:302019-10-19T11:28:40+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९: महायुतीला सर्वत्र प्रचंड प्रतिसाद असून, आम्ही पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी सज्ज आहोत.

Exclusive: narendra Modi so many rally in Maharashtra say Chief Minister | Exclusive: ...म्हणून महाराष्ट्रात मोदींच्या एवढ्या सभा घेतल्या; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं (राज)कारण

Exclusive: ...म्हणून महाराष्ट्रात मोदींच्या एवढ्या सभा घेतल्या; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं (राज)कारण

Next

- यदु जोशी
मुंबईः महायुतीला सर्वत्र प्रचंड प्रतिसाद असून, आम्ही पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी सज्ज आहोत. पंतप्रधानांच्या अधिक सभा व्हायला हव्या होत्या, असे मला वाटते, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. मतदारांना गृहित धरणे योग्य नाही. तुम्ही तसे केले तर मग मतदारही तुम्हाला गृहित धरू शकतील. आमच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय. सरकारसाठी अनुकूल असे वातावरण आहे. निकालात ते दिसेलच, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला.

बंडखोर अनेक ठिकाणी आहेत पण लोक चिन्ह पाहून महायुतीलाच मतदान करतील हा माझा विश्वास आहे. बंडखोरांचा मोठा त्रास होणार नाही. चॅनेल्सवर जो दाखवताहेत तसा कुठलाही सर्व्हे झालेला नाही. जो झालाय त्याची माहिती मी नंतर देईन, पण तो ‘एन्करेजिंग’ आहे. माण आणि कणकवलीत भाजप-शिवसेना आमनेसामने आहेत. या दोन्ही जागा भाजपाच जिंकेल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. मला माझा पक्ष सांगेल त्याक्षणी मी दिल्लीत जाईन. उद्या पक्षानं म्हटलं घरी बस तर घरी बसेल. आता जेवढं मला राजकारण समजत त्यानुसार माझी राज्यात गरज आहे. पक्षालाही वाटतं की मी महाराष्ट्रातच राहावं. त्यामुळे मी इथे आहे आणि राहीन, असं म्हणत त्यांनी दिल्लीला जाण्याच्या प्रश्नाला उत्तर दिलं.

राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासूनच मला सर्व जातीधर्मांच्या लोकांनी स्वीकारले. जात ही जनतेच्या मनात नसते ती राजकारण्यांच्या मनात असते. लोकांच्या मनात जात असती तर राज्यात आरक्षणावरून मोठे आंदोलन सुरू असताना आम्ही सगळ्या निवडणुका जिंकलोच नसतो. राजकीय नेते जातीची ढाल मतलबासाठी वापरतात. आरक्षणाचा टक्का वाढल्याने राज्यातील काही समाजांमध्ये अन्यायाची भावना आहेच. ती निश्चितपणे दूर केली जाईल आणि त्यासाठी 2018पूर्वी खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या बहाल केल्या जातील आणि त्या वेळोवेळी वाढविल्या जातील.

बारामतीची 'ती' खेळी राज ठाकरेंना आता कळली असेल; मुख्यमंत्र्यांचा टोला

 ''राज्य बँकेच्या घोटाळ्यात शरद पवार यांचा संबंध''

सावरकरांना 100 टक्के भारतरत्न मिळणार, त्यांना सन्मान देण्याची हीच योग्य वेळ- गडकरी

फेसबुकवरील आक्षेपार्ह पेजेसविरोधात मनसेची तक्रार; 'त्यांना' वेळीच आवरा अन्यथा...

शिवसेनेचं पुन्हा गुजराती प्रेम; एकनाथ शिंदेंच्या जाहिरातीवर मराठी भाषिक संतप्त

Web Title: Exclusive: narendra Modi so many rally in Maharashtra say Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.