Exclusive: 'ड्राय डे' असूनही मुंबईतील फाईव्ह स्टार क्लबमध्ये होतेय दारुविक्री, बिलवर तारीख उद्याची!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 11:15 PM2022-10-02T23:15:31+5:302022-10-02T23:16:49+5:30

महात्मा गांधी जयंतीनिमित्त आज 'ड्राय डे' असतानाही मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमधील मेन्शन नावाच्या क्लबमध्ये बिनदिक्कतपणे दारुविक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Exclusive story Inspite of Dry Day liquor is being sold in five star clubs in Mumbai sahara star mansion club | Exclusive: 'ड्राय डे' असूनही मुंबईतील फाईव्ह स्टार क्लबमध्ये होतेय दारुविक्री, बिलवर तारीख उद्याची!

Exclusive: 'ड्राय डे' असूनही मुंबईतील फाईव्ह स्टार क्लबमध्ये होतेय दारुविक्री, बिलवर तारीख उद्याची!

googlenewsNext

मुंबई-

महात्मा गांधी जयंतीनिमित्त आज 'ड्राय डे' असतानाही मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमधील मेन्शन नावाच्या क्लबमध्ये बिनदिक्कतपणे दारुविक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सहारा स्टार हॉटेलमधील मेन्शन (Mansion) नावाच्या क्लबमध्ये दारुविक्री सुरू असून चक्क क्लबकडून 'नो ड्राय डे' नावानं जाहिरातबाजी देखील करण्यात आली होती. या जाहिरातीमुळे क्लबमध्ये तळीरामांनी चांगलीच गर्दी केली होती. इतकंच नव्हे, तर कारवाईचा बडगा टाळण्यासाठी क्लबनं चलाखीनं ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या बिलवर उद्याची म्हणजेच ३ ऑक्टोबरची तारीख नमूद केली जात आहे. 

क्लबकडून केल्या जाणाऱ्या या नियमभंगाची माहिती महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी दिली आहे. तसंच त्यांनी पुरावा म्हणून क्लबचं बिलही शेअर केलं आहे. "आज महात्मा गांधी जयंतीनिमित्त संपूर्ण देशात ड्राय डे असूनही मुंबईतील हॉटेलमध्ये बिनधास्तपणे दारुविक्री केली जात आहे. काही पैशांसाठी तुम्ही राष्ट्रपित्याचा अपमान करत आहात आणि महाराष्ट्र युवक काँग्रेस हे अजिबात सहन करणार नाही. आज दोन तारीख असूनही मला तीन तारखेचं बिल देण्यात आलं आहे. तसंच बिलावर नमूद करण्यात आलेला जीएसटी क्रमांकही हॉटेलशी मॅच होत नाही. आता याची राज्याचं उत्पादन शुल्क विभाग दखल घेणार का?", असा सवाल अक्षय जैन यांनी उपस्थित केला आहे. 

२ ऑक्टोबर रोजी ड्राय डे असतानाही क्लबकडून 'नो ड्राय डे' अशी जाहिरातबाजी सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आली होती. याचेही स्क्रिनशॉट आता समोर आले आहेत. मेन्शन नावाच्या या क्लबच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर करण्यात आली आहे. त्यात #NoDryDay हा हॅशटॅग वापरण्यात आला आहे. त्यामुळे या फाइव्हस्टार हॉटेलला आता कायद्याचाही धाक राहिलेला नाही का? किंवा यांना नेमकं कोण पाठिशी घालत आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Exclusive story Inspite of Dry Day liquor is being sold in five star clubs in Mumbai sahara star mansion club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.