वांद्रे-कुर्ला संकुलात बांधणार एक्झिबिशन सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 03:47 AM2018-10-25T03:47:31+5:302018-10-25T03:47:38+5:30

बुलेट ट्रेनच्या कामासाठी वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीएचे मैदान राजकीय सभा आणि कार्यक्रमांसाठी भाडेतत्त्वावर देणे बंद करण्यात आले आहे.

Exhibition Center built in Bandra-Kurla Complex | वांद्रे-कुर्ला संकुलात बांधणार एक्झिबिशन सेंटर

वांद्रे-कुर्ला संकुलात बांधणार एक्झिबिशन सेंटर

googlenewsNext

- अजय परचुरे 

मुंबई : बुलेट ट्रेनच्या कामासाठी वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीएचे मैदान राजकीय सभा आणि कार्यक्रमांसाठी भाडेतत्त्वावर देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे एमएमआरडीएचा उत्पन्नाचा एक मुख्य स्रोत बंद झाला होता. ही तूट भरून काढण्यासाठी एमएमआरडीए वांद्रे-कुर्ला संकुलात कायमस्वरूपी एक्झिबिशन सेंटर उभारणार आहे.
वांद्रे-कुर्ला संकुलात जी ब्लॉकमधील ४० हजार चौ.मी. जागेवर (नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या मागच्या बाजूला) हे एक्झिबिशन सेंटर तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती एमएमआरडीएचे सहप्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या सेंटरमुळे एमएमआरडीएला वर्षाला किमान १० कोटींचे उत्पन्न मिळणार आहे.
तीन महिन्यांत होणार कामाला सुरुवात
मोठमोठ्या राजकीय सभा आणि बॉलीवूडच्या अवॉर्ड सोहळ्यांमुळे एमएमआरडीएचे हे मैदान नेहमी गजबजलेले असायचे. मात्र, बुलेट ट्रेनच्या कामामुळे ही जागा कार्यक्रमांसाठी वापरण्यास बंद करण्यात आली. मात्र, आता मैदानातील मोकळ्या भूखंडावर एक्झिबिशन सेंटर उभारून आयोजकांना आकर्षित करण्याचा विचार आहे.

Web Title: Exhibition Center built in Bandra-Kurla Complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.