‘कृषी संजीवनी’ची व्याप्ती वाढविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 04:54 AM2019-09-19T04:54:20+5:302019-09-19T04:54:23+5:30

जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यात आली

Expanded the scope of 'Agriculture Sanjivani' | ‘कृषी संजीवनी’ची व्याप्ती वाढविली

‘कृषी संजीवनी’ची व्याप्ती वाढविली

Next

मुंबई : जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यात आली असून, आता २ ते ५ हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला.
विदर्भ व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त ४ हजार २१० गावांमध्ये तसेच पूर्णा नदीच्या खोºयातील ९३२ गावे अशा ५ हजार १४२ गावांमध्ये कृषी संजीवनी प्रकल्प (हवामान अनुकूल कृषी प्रकल्प) राबविण्यात येत आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे ४ हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये राबविला जात आहे.
आजच्या निर्णयानुसार, अत्यल्प व अल्प भूधारक शेतकºयांबरोबरच आता २ ते ५ हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्यांना प्रकल्पांतर्गत विविध बाबींसाठी लाभ दिला जाणार आहे. प्रकल्प गावातील अत्यल्प व अल्प भूधारक शेतकरी आणि भूमिहीन कुटुंबे यांना वैयक्तिक लाभाच्या बाबींसाठी अर्थसहाय्याचे प्रमाण ५० टक्क्यांवरून आता ७५ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. तसेच २ ते ५ हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्यांनाा ६५ टक्के अर्थसहाय्य दिले जाईल.

Web Title: Expanded the scope of 'Agriculture Sanjivani'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.