सीएसटीत फलाटांचा विस्तार डिसेंबरमध्ये
By admin | Published: September 22, 2014 01:22 AM2014-09-22T01:22:42+5:302014-09-22T01:22:42+5:30
हार्बर मार्गावर १२ डबा चालवण्यात येणार असून, त्यासाठी मध्य रेल्वेकडून प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण केले जात आहे. सीएसटीवरील हार्बरच्या प्लॅटफॉर्मचेही विस्तारीकरण केले जाणार
मुंबई : हार्बर मार्गावर १२ डबा चालवण्यात येणार असून, त्यासाठी मध्य रेल्वेकडून प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण केले जात आहे. सीएसटीवरील हार्बरच्या प्लॅटफॉर्मचेही विस्तारीकरण केले जाणार असून, यासाठी स्थानकातील दोन प्लॅटफॉर्म तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात सीएसटी स्थानकात हे काम करण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर १२ डबा लोकल धावत असून, अद्याप हार्बर मार्गावर नऊ डबा लोकलच धावत आहेत. त्यामुळे हार्बरवरही १२ डबा लोकल सुरू कराव्यात, अशी मागणी हार्बरवासीयांची होती. त्यादृष्टीने मध्य रेल्वेने कामही सुरू केले असून, गेल्या वर्षभरापासून हार्बरवरील काही स्थानकांच्या प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण केले जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सीएसटी स्थानकातही एक आणि दोन नंबर प्लॅटफॉर्म हार्बर रेल्वेचे आहेत. यात एक नंबर प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण करताना रेल्वेला जागा नसून त्यामुळे दोन नंबर प्लॅटफॉर्मचे काम हाती घेतले जाणार आहे. यासाठी हे दोन्ही प्लॅटफॉर्म बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील वाहतूक कुर्ला आणि वडाळा स्थानकातून सुरू ठेवण्यात येणार असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात हार्बरवासीयांना फटका बसण्याची शक्यता आहे.
सीएसटीतील दोन नंबर आणि मेन लाइनच्या तीन नंबर प्लॅटफॉर्मवर प्रसाधनगृही असून,२ ते या तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.