Join us

दिवाळीच्या खरेदीला उधाण

By admin | Published: October 14, 2016 7:00 AM

दिवाळी अगदी दोन आठवड्यांवर आली आहे. दिवाळीच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज झाली असून, खरेदीची लगबग अनेक बाजारपेठांमध्ये पाहायला

मुंबई : दिवाळी अगदी दोन आठवड्यांवर आली आहे. दिवाळीच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज झाली असून, खरेदीची लगबग अनेक बाजारपेठांमध्ये पाहायला मिळत आहे. दागिने आणि कपड्यांच्या खरेदीला उधाण आले आहे. त्यामुळे सुट्टीचे दिवस वगळून इतर दिवशीही बाजारात ग्राहकांची गर्दी दिसत आहे. दरम्यान, आॅक्टोबर हीटही वाढू लागली असली, तरी खरेदीचा उत्साह टिकून आहे.दसरा झाला की, दिवाळीचे वेध लागतात. दिवाळीसाठी मग बाजारपेठाही हाउसफुल्ल होऊ लागतात. शहरासह उपनगरांतील बाजारपेठांमधील साहित्यांची आवक-जावक वाढू लागली आहे. बाजारपेठा फराळापासून ते फटाक्यांपर्यंत सज्ज झाल्या आहेत. सध्या दादर, क्रॉफर्ड मार्केट, घाटकोपर, कुर्ला, विलेपार्ले, बोरीवली येथील बाजारांमध्ये खरेदीला उधाण आले आहे. दसऱ्याच्याच दिवशी अनेक दुकानांनी दिवाळीसाठी लागणारे विविध साहित्य विक्रीसाठी मांडण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, ऐन दिवाळीत घाई होऊ नये आणि मनपसंत वस्तू मिळावी, यासाठी अनेकांनी दिवाळीच्या खरेदीला सुरुवात केली आहे. सध्या दिवाळी साहित्यासोबतच कपडे आणि इमिटेशन दागिन्यांची खरेदी करताना अनेक जण दिसत आहेत. दोन-चार दिवसांत या खरेदीला वेग येणार असून, शहर व उपनगरातील बाजारपेठांतील गर्दी ओसंडून वाहणार आहे. (प्रतिनिधी)