केवळ आरक्षित तिकीट असणारेच करू शकतात प्रवास
लोकमत न्युज नेटवर्क
मुंबई : मुंबई व पुणे येथून सुटणाऱ्या विशेष गाड्यांच्या सेवांचा विस्तार करण्यात आला आहे. या विस्तारित फेऱ्यांचे विशेष शुल्कासह आरक्षण हे सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि रेल्वेच्या संकेतस्थळावर १३ एप्रिल रोजी सुरू होईल. केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमधून प्रवासाची परवानगी आहे. त्यांनी कोराेना प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) - दानापूर विशेष सेवा (सोमवार, गुरुवार) २२ एप्रिलपासून २९ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. दानापूर - सीएसएमटी विशेष (मंगळवार, शुक्रवार) सेवा २३ एप्रिलपासून ३० एप्रिलपर्यंत वाढविली आहे. तर सीएसएमटी - गोरखपूर विशेष गाडीची सेवा (सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार व रविवार) २१ एप्रिलपासून ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. याचप्रमाणे गोरखपूर - सीएसएमटी विशेष (सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार व रविवार) गाडीची सेवा २३ एप्रिलपासून २ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त सीएसएमटी-गोरखपूर विशेष (मंगळवार) सेवा २७ एप्रिलपर्यंत, गोरखपूर-सीएसएमटी विशेष (गुरुवार) सेवा २९ एप्रिलपर्यंत, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) - गोरखपूर विशेष (मंगळवार) सेवा २७ एप्रिलपर्यंत, गोरखपूर-एलटीटी विशेष (गुरुवार) सेवा २९ एप्रिलपर्यंत, एलटीटी - दरभंगा विशेष (सोमवार) २६ एप्रिलपर्यंत, दरभंगा-एलटीटी विशेष (मंगळवार) सेवा २७ एप्रिलपर्यंत, पुणे-दानापूर विशेष (शुक्रवार, रविवार) सेवा २३ एप्रिलपासून ३० एप्रिलपर्यंत तर दानापूर - पुणे विशेष (रविवार, मंगळवार) सेवा २५ एप्रिलपासून २ मेपर्यंत वाढविली आहे.
......................................