अपयश दडपण्यासाठीच विस्तार- अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 05:13 AM2019-06-17T05:13:57+5:302019-06-17T05:14:13+5:30
भाजप-शिवसेना राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील फेरबदल म्हणजे भ्रष्टाचार आणि मागील साडेचार वर्षातील अपयश दडपण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.
मुंबई : भाजप-शिवसेना राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील फेरबदल म्हणजे भ्रष्टाचार आणि मागील साडेचार वर्षातील अपयश दडपण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.
ते म्हणाले, प्रकाश मेहता आणि इतर मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सरकार अडचणीत आले आहे. लोकायुक्त आणि न्यायालयांनी मंत्र्यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात कारवाईचे आदेश दिले. मात्र मुख्यमंत्र्यांची या मंत्र्यांवर कोणतीही कारवाई करायची तयारी नाही. त्यामुळेच प्रकाश मेहता यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्याऐवजी त्यांना केवळ मंत्रिमंडळातून करुन या प्रकरणावर पडदा पाडण्याचा खटाटोप सुरू आहे. सरकारने कितीही प्रयत्न केले तरी ते भ्रष्टाचाराचे आपले पाप लपवू शकणार नाही, असा इशाराही चव्हाण यांनी दिला.