शनिवार, रविवारीही वाढले प्रवासी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 01:33 AM2019-07-16T01:33:55+5:302019-07-16T01:34:02+5:30
बसभाड्यात कपात केल्यानंतर दररोजचे नव्हेतर, वीकेण्डला बाहेर फिरण्यास निघणारे मुंबईकरही बेस्ट बसगाड्यांनाच पसंती देत आहेत.
मुंबई : बसभाड्यात कपात केल्यानंतर दररोजचे नव्हेतर, वीकेण्डला बाहेर फिरण्यास निघणारे मुंबईकरही बेस्ट बसगाड्यांनाच पसंती देत आहेत. त्यामुळे शनिवार आणि रविवार या दोन दिवसांतही पूर्वीपेक्षा पाच लाख प्रवासी वाढल्याचे दिसून आले. परिणामी, बेस्टच्या उत्पन्नातील घटही कमी होत आहे.
बेस्ट उपक्रमाने गेल्या मंगळवारपासून प्रवाशी भाड्यात मोठी कपात केली आहे. किमान भाडे पाच रुपये ते कमाल भाडे २० रुपये करण्यात आले आहे. तसेच वातानुकूलित बसगाड्यांच्या भाड्यातही कपात करण्यात आली आहे. त्यामुळे भाडेकपातीच्या पहिल्याच दिवसापासून प्रवासी संख्या वाढत गेल्या चार दिवसांत २५ लाखांपर्यंत पोहोचली.
दररोज कामावर जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी बसगाड्यांना असते. यामध्ये सव्वासात लाखांची वाढ झाल्याचे दिसून आले. मात्र शनिवार व रविवार या वीकेण्डला बहुतेक कार्यालयांना रजा असल्याने प्रवासी संख्या नेहमीपेक्षा निम्म्याहून कमी होते. मात्र या दोन दिवसांतही प्रवाशांची वाढ दुप्पट असल्याचे दिसून आले.
>६ जुलै (शनिवार)
प्रवासी-१५,४५,८९८
उत्पन्न-१,९५,९८,६९०
१३ जुलै (शनिवार)
प्रवासी-२०,९०,९५३
उत्पन्न-१,३७,८५,४५०
७ जुलै (रविवार)
प्रवासी-९,७९,१७५
उत्पन्न- १,३७,१८,०२५
१४ जुलै (रविवार)
प्रवासी - १४,६३,८२१
उत्पन्न- १,०५,७४,४८०