कामांसाठी २४ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

By admin | Published: October 17, 2015 02:34 AM2015-10-17T02:34:10+5:302015-10-17T02:34:10+5:30

कोकण रेल्वेवरील दुहेरी मार्गाचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. या संपूर्ण मार्गावर विद्युतीकरणाचाही प्रस्ताव असून हा प्रस्तावही पाठवण्यात आला असून दोन्ही

Expected to spend Rs. 24 thousand crore for the work | कामांसाठी २४ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

कामांसाठी २४ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Next

मुंबई : कोकण रेल्वेवरील दुहेरी मार्गाचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. या संपूर्ण मार्गावर विद्युतीकरणाचाही प्रस्ताव असून हा प्रस्तावही पाठवण्यात आला असून दोन्ही प्रकल्पांसाठी एकूण २४ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा निधी जमवण्याचे आव्हान कोकण रेल्वेसमोर असून त्यासाठी जुळवाजुळव करण्यात येत आहे.
मध्य रेल्वेकडून पेण ते रोह््यापर्यंत दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून कोकण रेल्वेकडून दुहेरीकरणाचा फक्त प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. कोकण रेल्वेकडून रोहा ते ठोकूर या ७४१ किलोमीटर मार्गाचे दुहेरीकरण केले जाणार आहे. यात सध्या कोकण रेल्वेच्या अभियंता आणि वाहतूक विभागाकडून रोहा ते वीरपर्यंतचा प्राथमिक सर्वेक्षणाचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. संपूर्ण दुहेरीकरणासाठी तब्बल १२ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. याचबरोबर का.रे.चे विद्युतीकरणही केले जाणार असून त्याचा प्रस्तावही तयार करुन तो रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. या विद्युतीकरणासाठीही १२ हजार कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहीती कोकण रेल्वेचे महाप्रबंधक (प्रशासन) सिध्देश्वर तेलगु यांनी दिली.

Web Title: Expected to spend Rs. 24 thousand crore for the work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.