जोगेश्वरीच्या कचरपेटीत आधारकार्डचा खच, पोलिसांकडून चौकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 04:14 AM2020-09-04T04:14:25+5:302020-09-04T04:15:14+5:30
जोगेश्वरी पूर्वच्या स्मशानभूमीजवळील कचरापेटीत नागरिकांची आधारकार्ड उघड्यावर फेकण्यात आली होती. पालिकेच्या के पूर्वचे घनकचरा विभागाचे कर्मचारी तेथे पोहोचले असता हा प्रकार उघडकीस आला.
मुंबई: जोगेश्वरीच्या कचरपेटीत गुरुवारी सकाळी आधारकार्डचा मोठा खच सापडल्याने खळबळ उडाली. याबाबत मेघवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत. या प्रकारामागे कुरिअर बॉयचा हात असल्याचा संशय आहे.
जोगेश्वरी पूर्वच्या स्मशानभूमीजवळील कचरापेटीत नागरिकांची आधारकार्ड उघड्यावर फेकण्यात आली होती. पालिकेच्या के पूर्वचे घनकचरा विभागाचे कर्मचारी तेथे पोहोचले असता हा प्रकार उघडकीस आला. मेघवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व आधारकार्ड जमा केली.
याप्रकरणी मेघवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर निगुडकर यांना मेसेज आणि फोनमार्फत संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. याप्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कचऱ्यात सापडलेली आधारकार्ड घरोघरी पोहोचविण्याचे काम काम एका खासगी कुरिअर बॉयला देण्यात आले होते. मात्र त्याला काही महिन्यांपूर्वी नोकरीवरून कमी करण्यात आले. त्याने ही कार्ड कचºयात फेकली असावी असा संशय असून पोलीस तपास सुरू आहे.