झोपड्यांवरील कारवाई पडतेय महागात, डेब्रिज विल्हेवाटीसाठी सव्वा कोटीचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 01:50 AM2017-11-10T01:50:22+5:302017-11-10T01:50:48+5:30

मुंबईला पाणीपुरवठा करणा-या जलवाहिन्यांना अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेची झोपड्यांवर कारवाई सुरू आहे.

Expenditure for the disposal of debris at the cost of the building, for the disposal of debris, cost of one and a half crore | झोपड्यांवरील कारवाई पडतेय महागात, डेब्रिज विल्हेवाटीसाठी सव्वा कोटीचा खर्च

झोपड्यांवरील कारवाई पडतेय महागात, डेब्रिज विल्हेवाटीसाठी सव्वा कोटीचा खर्च

googlenewsNext

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणा-या जलवाहिन्यांना अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेची झोपड्यांवर कारवाई सुरू आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीत या झोपड्या पाडण्यासाठी मोहिमेने वेग घेतला आहे. मात्र केवळ घाटकोपर येथील जलवाहिन्यांवरील झोपड्यांच्या डेब्रिजचा खर्चच एक कोटी १८ लाख एवढा आहे. त्यामुळे कारवाईनंतर निर्माण होणाºया डेब्रिजची विल्हेवाट लावणे महापालिकेसाठी महागात पडत आहे.
मुख्य जलवाहिन्यांच्या सुरक्षेसाठी जलवाहिन्यांच्या दुतर्फा दहा मीटर परिसरातील झोपड्या हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. जलवाहिन्यांच्या बाजूला १५ हजार ७८९ झोपड्या होत्या. यापैकी २०११ पासून पाच हजार झोपड्या हटविण्यात आल्या आहेत. गेल्या महिन्यात वांद्रे येथील गरीबनगर झोपडपट्टीतील तीनशेपैकी शंभर झोपड्या पालिकेने हटविल्या. मात्र कारवाई सुरू असतानाच तेथे अग्नितांडव सुरू झाले. तेथील कारवाईवर स्थगिती आल्यामुळे अन्य ठिकाणी जलवाहिन्यांवरील झोपड्यांवर कारवाई सुरू आहे.
या कारवाईतून प्रचंड डेब्रिज निर्माण होत आहे. डिसेंबर २०१७ पर्यंत ही कारवाई पूर्ण करून झोपड्या अतिक्रमणमुक्त करण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे. घाटकोपर येथील राजावाडी रोड, खंडोबा टेकडी येथील तानसा जलवाहिन्यांवरील झोपड्या हटविण्याचे काम सुरू आहे.
या परिसरात दोन हजार २१३ झोपड्या आहेत. यातून ३१ हजार तीनशे मेट्रिक टन डेब्रिज निघणार आहे. देवनार, मुलुंड आणि कांजूरमार्ग कचराभूमीवर या डेब्रिजची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेला हा खर्च येणार आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाºया तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा या तलावातून मोठ्या जलवाहिन्यांद्वारे मुंबईत पाणी आणले जाते. मात्र या जलवाहिन्यांच्या परिसरात तर कुठे जलवाहिन्यांवरच झोपड्या उभ्या राहिल्याने जलवाहिन्यांना धोका निर्माण झाला आहे.


पालिकेच्या अहवालानुसार जलवाहिन्यांवर एकूण १५ हजार ७८९ झोपड्या आहेत. चार टप्प्यांत या झोपड्यांवर कारवाई होणार आहे.
पहिल्या व दुसºया टप्प्यात माटुंगा, भांडुप, घाटकोपर, मुलुंड, चेंबूर येथील साडेआठ हजार झोपड्या हटविण्यात आल्या आहेत.
कुर्ला, वांद्रे, वडाळा येथील झोपड्यांचा पात्र-अपात्रतेचा वाद आहे. त्यामुळे येथे कारवाईसाठी वेळ लागत आहे.

जलवाहिनीच्या
बाजूच्या झोपड्या
के (पूर्व) अंधेरी १४०८ (झोपड्यांचा सर्व्हे पूर्ण)
एफ (उत्तर) वडाळा, सायन-२४०१ (रहिवासी कोर्टात)
एच (पूर्व) वांद्रे १६३३ (सर्व्हे पूर्ण)
एल कुर्ला ५५०७ (३१५ झोपड्या हटवल्या)
जी उत्तर ५०९

Web Title: Expenditure for the disposal of debris at the cost of the building, for the disposal of debris, cost of one and a half crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.