मनपा निवडणुकांमधील उमेदवाराची खर्च मर्यादा 5 ते 10 लाखांवर

By admin | Published: February 1, 2017 02:38 PM2017-02-01T14:38:17+5:302017-02-01T14:38:17+5:30

महानगरपालिका निवडणुकांतील उमेदवारांसाठी खर्चाची सुधारीत मर्यादा 5 ते 10 लाख रुपयापर्यंत करण्यात आली आहे

Expenditure limit for candidates in municipal elections will be 5 to 10 lakhs | मनपा निवडणुकांमधील उमेदवाराची खर्च मर्यादा 5 ते 10 लाखांवर

मनपा निवडणुकांमधील उमेदवाराची खर्च मर्यादा 5 ते 10 लाखांवर

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि.1 - महानगरपालिका निवडणुकांतील उमेदवारांसाठी खर्चाची सुधारीत मर्यादा 5 ते 10 लाख रुपयापर्यंत करण्यात आली आहे; तसेच जिल्हा परिषदांच्या उमेदवारांसाठी 4 ते 6 लाख आणि पंचायत समित्यांच्या उमेदवारांकरिता 3 ते 4 रुपयापर्यंत खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी  दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, सुधारीत खर्च मर्यादेनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उमेदवारांसाठी 10 लाख रुपये एवढी खर्च मर्यादा असेल. अन्य महानगरपालिकांच्या बाबतीत संबंधित महानगरपालिकेच्या एकूण सदस्य संख्येच्या प्रमाणानुसार उमेदवारांकरिता खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 
 
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीदेखील याच सूत्राप्रमाणे उमेदवारांकरिता खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. आयोगाच्या 30 जुलै 2011 च्या आदेशानुसार यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांकरिता खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार ‘अ’ वर्ग महानगरपालिकेच्या उमेदवारांसाठी 5, ‘ब’ व ‘क’ वर्ग महानगरपालिकेसाठी 4; तर ‘ड’ वर्ग महानगरपालिकेसाठी 3 लाख रुपये खर्च मर्यादा होती. जिल्हा परिषदांसाठी 3 लाख; तर पंचायत समित्यांच्या उमेदवारांसाठी 2 लाख रुपये खर्च मर्यादा पूर्वी होती, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.
 
सुधारित खर्च मर्यादा
स्थानिक स्वराज्य संस्था                    खर्च मर्यादा (लाखांत)
बृहन्मुंबई महानगरपालिका                        10
महानगरपालिका- सदस्य संख्या 151 ते 17510
महानगरपालिका- सदस्य संख्या 116 ते 1508
महानगरपालिका- सदस्य संख्या 86 ते 1157
महानगरपालिका- सदस्य संख्या 65 ते 855
 
जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्याजिल्हा परिषदापंचायत समित्या
71 ते 75 निवडणूक विभाग असलेले जिल्हे64
61 ते 70 निवडणूक विभाग असलेले जिल्हे53.5
50 ते 60 निवडणूक विभाग असलेले जिल्हे43
 

Web Title: Expenditure limit for candidates in municipal elections will be 5 to 10 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.