Join us

१.५ कोटींचा खर्च; मुंबई सेंट्रल बसस्थानकाचे रुपडे पालटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2023 10:01 AM

मुंबई सेंट्रल बसस्थानकाचे नूतनीकरण व सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.

मुंबई : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत मुंबई सेंट्रल बसस्थानकाचे नूतनीकरण व सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. संपूर्ण कायापालट झालेले सुशोभित बसस्थानक नवीन वर्षात प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे.   मुंबई-सेंट्रल बसस्थानकाच्या नूतनीकरण व सौंदर्यीकरण कामाचा शुभारंभ भायखळा मतदारसंघाच्या आमदार  यामिनी यशवंत जाधव यांच्या उपस्थितीत एसटी महामंडळाचे वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकारी गिरीष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमाला एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, सिनेट सदस्य निखिल यशवंत जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते व सर्वसामान्य प्रवासी उपस्थित होते.

कोणती कामे केली जाणार?  बसस्थानकाची  रंगरंगोटी प्रवेशव्दाराचे सुशोभीकरण संरक्षण भिंतीवर विविध चित्रांचे रेखाटन प्रवेशद्वाराजवळ बाग-बगिचा विकसित करणे संगणकीय आरक्षण केंद्राची दुरूस्ती   प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था 

सुशोभित बसस्थानक नवीन वर्षात प्रवाशांच्या सेवेसाठी होणार उपलब्ध :

  सन १९६४ साली बांधण्यात आलेले मुंबई-सेंट्रल हे बसस्थानक प्रामुख्याने गिरगाव, परळ, भायखळा या भागातील चाकरमान्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे बसस्थानक आहे.   कोकण, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातून नोकरी-धंद्यानिमित्त मुंबईत स्थायिक झालेल्या चाकरमान्यांना गणपती उत्सव, होळी, दिवाळी, उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आपापल्या गावी जाण्यासाठी मुंबई-सेंट्रल हे बसस्थानक जवळचे आहे.

   दररोज सुमारे १ हजार बसफेऱ्यांच्या माध्यमातून १० हजारपेक्षा जास्त प्रवाशांचा चढउतार या बसस्थानकातून होत असतो.

संपूर्ण कायापालट :

मुंबई-सेंट्रल बसस्थानक नूतनीकरणासाठी  दीड कोटी रुपये पेक्षा जास्त रक्कम  जाधव यांच्या आमदार निधीतून जिल्हा विकास मंडळाच्या माध्यमातून खर्च करण्यात येणार आहे.या कामाद्वारे संपूर्ण कायापालट झालेले सुशोभित बसस्थानक नवीन वर्षात प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल.

टॅग्स :मुंबई