Join us

रेल्वे हद्दीतील वृक्ष छाटणीचा खर्च पालिकेच्या माथी; रेल्वेचा हात आखडता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 11:27 AM

रेल्वेच्या हद्दीतील वृक्ष छाटणीचे काम मुंबई महापालिका करत असली तरी या छाटणीचा खर्च पालिकेच्या माथ्यावर पडणार आहे.

मुंबई: रेल्वेच्या हद्दीतील वृक्ष छाटणीचे काम मुंबई महापालिका करत असली तरी या छाटणीचा खर्च पालिकेच्या माथ्यावर पडणार आहे. यापूर्वी रेल्वे खर्चातील काही हिस्सा पालिकेला देत असे, यावेळेस मात्र रेल्वेने हात आखडता घेतला आहे. 

मुंबई महापालिकेने पावसाळापूर्व कामे हाती घेतली आहेत. त्यात वृक्ष छाटणीच्या कामाचाही समावेश आहे. याचाच भाग म्हणून रेल्वे मार्गालगतच्या झाडांचीही छाटणी सुरू आहे. मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे हद्दीतील ५२ ठिकाणी ही कामे सुरू असून, २ हजार ४२४ झाडांची छाटणी करणे गरजेचे असून, ही कामे ५० टक्के पूर्ण झाली आहेत. 

पश्चिम रेल्वे मार्गालगत १६, मध्य रेल्वे मार्गालगत १६ आणि हार्बर मार्गालगत २ ठिकाणी छाटणीची कामे केली जात आहेत. यापूर्वी रेल्वे प्रशासन त्यांच्या हद्दीतील झाडांची छाटणी स्वतः करत असे. त्यामुळे पालिकेला कोणताही खर्च करावा लागत नव्हता. आता मात्र पालिकेच्या वतीने छाटणी केली जात असून, खर्चही पालिकेला करावा लागत आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी...

प्रवाशांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून पूर्वी रेल्वेला सरसकट झाडे कापण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, त्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. आवश्यक आहेत तीच झाडे कापावीत, असे न्यायालयाने सांगितले. त्यानुसार कमकुवत झाडांची निवड केली जाते.

टॅग्स :मुंबईमध्य रेल्वेपश्चिम रेल्वे