अधिकाऱ्यांच्या दौऱ्यावर साडेसात कोटी खर्च, मलिक यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 05:18 AM2019-03-08T05:18:07+5:302019-03-08T05:18:14+5:30
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) ७ कोटी ६३ लाख रुपये खर्च केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.
मुंबई : उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवई यांच्यासह पाच अधिकाऱ्यांच्या परदेश दौ-यावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) ७ कोटी ६३ लाख रुपये खर्च केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौºयावर ९० लाख खर्च झालेला असताना अधिकाºयांच्या दौºयावर एवढा खर्च कसा, असा सवालही मलिक यांनी केला आहे.
२१ जानेवारी ते २५ जानेवारी २०१९ दरम्यान सतीश गवई यांच्यासह पी अन्बलगन, गजानन पाटील आणि दोन स्वीय सहायक दाओस ला गेले होते. या अधिकाºयांच्या कपडे धुणे आणि नाश्तासाठी जवळजवळ २ कोटी ३५ लाख रुपये खर्च करण्यात आले. विशेष म्हणजे, खर्चाची बिले फ्लोरिडा येथील प्रिमियम मोटर्स अॅण्ड कार्स या जुन्या गाड्या विकणाºया कंपनीच्या नावे आहेत, असेही मलिक यांचे म्हणणे आहे.
सरकार उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घेणाºया उद्योगांना इन्सेंटिव्ह देत असते. याचाच फायदा घेत काही उद्योग उभारणीसाठी पुढे येणाºया बिल्डरांना हाच इन्सेंटिव्ह ४० टक्के कसा मिळेल याचा प्रयत्न केला गेला,असा आरोप मलिक यांनी केला. सरकारने मेगा प्रोजेक्टसाठी ९५ टक्के इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या दोन्ही प्रकारच्या इन्सेंटिव्हची रक्कम जवळपास २८५ कोटी रुपये होते. ती रक्कम बोगस बिले दाखवून दिली गेली आणि त्यासाठीच गवई यांना लाच देण्यासाठी डाओसचा दौरा आखला गेला, असा आरोपही मलिक यांनी केला.
या आरोपांवर सतीश गवई यांची बाजू विचारण्यासाठी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा एक मोबाईल नंबर
फॉरवर्ड करुन ठेवण्यात आला
होता. तर दुसरा नंबर उचलला जात नव्हता.