लॉकडाऊनमध्ये मदत करणे पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:06 AM2020-12-22T04:06:32+5:302020-12-22T04:06:32+5:30
फाेर्ट येथील प्रकार : मालकाचे ६० हजार रुपये घेऊन नाेकर पसार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लॉकडाऊन काळात मदत ...
फाेर्ट येथील प्रकार : मालकाचे ६० हजार रुपये घेऊन नाेकर पसार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लॉकडाऊन काळात मदत म्हणून नोकरी दिली. मात्र, मालकाचे ६० हजार रुपये घेऊन नोकर पसार झाला. या प्रकरणी आझाद मैदान पोलीस अधिक तपास करत आहेत.
फोर्ट परिसरात तक्रारदार यांचे हॉटेल आहे. त्यांच्याकडे प्रोसेनजित दास नावाचा व्यक्ती बारटेंडर म्हणून काम करत हाेता. त्याला २५ हजार रुपये पगार होता. मार्च, २०२० मध्ये लॉकडाऊन जाहीर झाले, सर्व कामगारांना सुट्टी द्यावी लागली. ज्यांना मूळ गावी जाणे शक्य नव्हते, असे काही नोकर तेथेच जेवण बनवून राहत होते. ३ महिन्यांपूर्वी दास पुन्हा कामावर आला. हॉटेल पूर्णपणे सुरू झाले नसतानाही त्याला मदत म्हणून मालकाने कमी पगार देऊन नाेकरीवर ठेवले. तो विश्वासू असल्याने त्याला कॅश काउंटरच्या चावीची माहिती दिली.
९ नोव्हेंबर रोजी दास कामावर नव्हता. फाेन केला असता, गावी निघून गेल्याचे त्याने सांगितले. मालकाला संशय आल्याने त्यांनी कॅश काउंटर तपासले. त्यातील ६० हजारांची राेकड गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दासने दिलेल्या पत्त्यावर मालकाने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ताे तेथे नव्हता. पुढे फेसबुकवरून त्यांनी त्याच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. दरम्यान, १६ डिसेंबरला ताे पश्चिम बंगाल परिसरात असल्याचे समजताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार, पाेलिसांनी रविवारी तक्रार दाखल करून घेतली असून, अधिक तपास सुरू आहे.
........................................................