विमानतळावर महागड्या घड्याळांसह ३ कोटींचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:06 AM2021-07-25T04:06:55+5:302021-07-25T04:06:55+5:30
मुंबई : मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाने येथील कार्गो संकुलात महागड्या घड्याळांसह ३ कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. आयात ...
मुंबई : मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाने येथील कार्गो संकुलात महागड्या घड्याळांसह ३ कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. आयात करात सवलत मिळवण्यासाठी सीमा शुल्क विभागाची दिशाभूल करून या वस्तू परदेशातून आणण्यात आल्या होत्या.
सीमा शुल्क विभागाच्या सीआययू पथकाने केलेल्या या कारवाईत ॲपल-६ (लिमिटेड एडिशन)ची १६० घड्याळे, ॲपलचे ६०० एअरपॉड्स आणि पाकिस्तानी बनावटीचे महागडे कपडे जप्त करण्यात आले आहेत. या सर्व वस्तूंचे बाजारमूल्य जवळपास ३ कोटी रुपये इतके असल्याचे सीमा शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.
कार्गो विमानाद्वारे आयात करण्यात आलेला हा माल मुंबईतील एका बड्या विक्रेत्याने मागवला होता. आयात करात सवलत मिळवण्यासाठी महागड्या वस्तूंचा उल्लेख कर पावतीत करण्यात आला नव्हता. सीआययू पथकाला संशय आल्यामुळे त्यांनी तपासणी केली असता, हा बनाव उघड झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली.