मुंबई--बोरीबलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गांधी टेकडी येथे निसर्गाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता, ३५ फूट उंच दगडावर 'रॉक क्लाइंबिंग सुविधांचे आज राज्याचे पर्यावरण मंत्री व उपनगराचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी उदघाटन केले.
सुरुवातीला सदर सुविधा फक्त क्लायंबर्ससाठी मर्यादित असेल कालांतराने इच्छुकांसाठी या ठिकाणी प्रशिक्षण देण्यास सुद्धा सुरुवात होईल. पुढील काळात या परिसरातील इतर टेकड्यांवरही अशा सुविधांची निर्मिती करण्याचा मानस आहे.
यावेळी उद्यानातील प्राण्यांच्या बचावासाठी व उपचारासाठी वाईल्ड लाईफ रुग्णवाहिकेचे उद्घाटन झाले त्याचबरोबर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या विकासासंदर्भात आराखड्याचे सादरीकरणही झाले.
याप्रसंगी आमदार व विभागप्रमुख विलास पोतनीस,मागाठाणे विधानसभा मतदार संघाचे स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे, वन विभागाचे अधिकारी वसंत लिमये,राजेश गाडगीळ, मल्लिकार्जून व महाऍडव्हेंचर कौन्सिलचे सदस्य उपस्थित होते.