Join us  

अनुभवी आणि नव्या चेहऱ्यांची होणार टक्कर

By admin | Published: October 30, 2016 2:42 AM

मुलगी, बहिणी, पत्नी तर कुठे नात असे काहीसे चित्र यंदा भांडुपमधल्या महिला राजमध्ये पाहावयास मिळत आहे. एस विभातील १४ प्रभागांपैकी ११ प्रभाग हे महिलांसाठी

- लोकमत टीम, मुंबईमुलगी, बहिणी, पत्नी तर कुठे नात असे काहीसे चित्र यंदा भांडुपमधल्या महिला राजमध्ये पाहावयास मिळत आहे. एस विभातील १४ प्रभागांपैकी ११ प्रभाग हे महिलांसाठी आरक्षित झाल्याने विद्यमान नगरसेवक, नेते मंडळींनी आपल्या कुटुंबातील महिलांना पुढे करण्यास सुरुवात केली आहे. यातून पक्षांतर्गत हेवेदावे सुरू झाले आहेत. या रुसव्याफुगव्यांतून कुठे मैत्री तुटली तर कुठे नाते तुटण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे एस वॉर्डातील यंदाची निवडणूक चर्चेचा विषय ठरणार आहे. यातूनच अनुभवी चेहऱ्यांना आव्हान देत काहीसे नवे चेहरे यंदाच्या निवडणुकीसाठी सज्ज झाल्याने यात तरुणाईचा अनोखा रंग मिसळताना दिसत आहे. मागील निवडणुकीत भांडुप एस विभाग अंतर्गत एकूण १३ प्रभाग होते. यंदा एक प्रभाग वाढवून एकूण १४ प्रभागांची रचना केलेली आहे. मागील निवडणुकीत एस विभागात मनसेला भरभरून मतदान केल्याने त्यांचे पाच नगरसेवक निवडून आले होते. कॉग्रेसचा एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तसेच शिवसेनेचे चार व एक अपक्ष नगरसेवक निवडून आला होता. अपक्ष उमेदवार मंगेश पवार यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने भाजपाने येथे खाते खोलले आहे. मात्र यंदा भांडुपमध्ये महिलांना अधिक प्राधान्य दिल्याने नवा प्रभाग क्र. ११४, ११५ व १२० हे खुले प्रभाग असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे दिग्गज पुरुष उमेदवार तीन खुल्या प्रभागांत मतदारांची चाचपणी करीत आहेत. अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. येथेही महिला उमेदवार धावपळ करत असल्याने त्यांच्या उमेदवारांच्या रागात भर पडताना दिसली. त्यात महिलाराजमुळे अनेक पक्षांतील नेतेमंडळींना हव्या तशा महिला उमेदवारही मिळत नसल्याचे चित्रही येथे पाहावयास मिळत आहे. भांडुपमधील काही प्रभागांमध्ये अनुभवी महिला उमेदवारांना टक्कर देण्यासाठी तरुणीही रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे एरव्ही काकू, ताई म्हणत मागे फिरणारी आपल्यासमोर उभी राहत असल्याने अंतर्गत धुसफूसही वाढली आहे. भांडुपमध्ये ऐतिहासिक असलेल्या शिवाजी तलावाच्या मुद्द्यावर उमेदवार रिंगणात उतरणार आहेत त्यामुळे त्याचे श्रेय घेण्यावरून पक्षांमध्ये वादही उफाळले आहेत. या भागांमध्ये भाजपाच्या नेत्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतदानाचा अभ्यास करून, त्यांनी प्रत्येक प्रभाग भाजपाबहुल कसा बनेल याचा विचार केला आहे. या अनुषंगाने मागील निवडणुकीतील तीन प्रभागांना विभागून एक प्रभाग नव्याने बनविला. यामध्ये सुमारे १५ ते २० हजार भाजपाप्रणीत मतदार एकत्र केलेले दिसत आहेत. मागील निवडणुकीत भांडुप एस विभाग अंतर्गत एकूण १३ प्रभाग होते. यंदा एक प्रभाग वाढवून एकूण १४ प्रभागांची रचना केलेली आहे. मागील निवडणुकीत एस विभागात मनसेला भरभरून मतदान केल्याने त्यांचे पाच नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेसचा एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तसेच शिवसेनेचे चार व एक अपक्ष नगरसेवक निवडून आला होता. अपक्ष उमेदवार मंगेश पवार यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने भाजपाने येथे खाते खोलले आहे.