अक्षय चोरगे मुंबई : औद्योगिकीकरणानंतर ओझोनची पातळी कमी झाल्याने ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळू लागला आहे. त्यामुळे सागराची पातळी १ ते ३ मीटर वाढेल, तसे झाल्यास सध्याची मुंबईसारखी शेकडो शहरे पाण्यात जातील. जगभरातील सुपीक प्रदेश नापीक होऊ लागतील. भूभागांचे वाळवंटात रूपांतर होईल,अशी भीती आता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. १६ सप्टेंबर हा ‘जागतिक ओझोन दिन’ असल्याने या सर्व विषयांची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.सूर्याची अतिनील किरणे ओझोन पृथ्वीपर्यंत पोहोचू देत नाही. पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीच्या रक्षणासाठी ओझोन अत्यावश्यक आहे. परंतु वाढते औद्योगिकीकरण, बेसुमार वृक्षतोड यामुळे जागतिक तापमान वृद्धीला आपणच जबाबदार आहोत. मानवाने तयार केलेल्या कारखान्यांची आणि रिफायनरींची धुराडी, वाहनांचे एक्झॉस्ट पाइप थर्मल पॉवरस्टेशन, मोठ्या प्रमाणात केले जाणारे प्रदूषण, डम्पिंग ग्राउंडवर जाळण्यात येणारा कचरा, कार्बनचे उत्सर्जन, स्प्रे आणि रेफ्रिजरेटर्ससाठी वापरला जाणारा क्लोरोफ्लुरो कार्बन या सर्वांमुळे आपणच जागतिक तापमान वाढीला खतपाणी घालत असल्याचे मत पर्यावरण मित्र भीमराव गमरे यांनी मांडले.तर दुसरीकडे हरितगृह वायू आकाशात ओतत आहोत. कार्बन डायआॅक्साईड, मिथेन नायट्रस आॅक्साईड आणि हॅकोकार्बन्स या वायूंचे उत्सर्जन होईल, अशी कामे करीत आहोत. या बाबी जागतिक तापमानवाढ आणि ओझोनला छिद्र पडण्यास कारणीभूत ठरत असल्याने आपण वेळीच सावध होणे आवश्यक आहे.ओझोन थर कमी झाल्यास....सूर्याची अतिनील किरणे पृथ्वीवर सहज पोहोचतील, त्यामुळे त्वचेच्या कर्करोगाला सामोरे जावे लागेल१ टक्के ओझोन कमी झाल्यास त्वचेच्या कर्करोगाची समस्या ३ टक्के वाढेलमोतीबिंदू होण्याच्या प्रमाणात वाढ होईलनागीन, कावीळ व इतर विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढेलतलाव, नदी आणि समुद्रातील सूक्ष्म जीव आणि सूक्ष्म वनस्पती नष्ट होतीलजलचरांची अन्नसाखळी बिघडेलशेतीवर भयंकर परिणाम होतीलधुरक्याचे प्रमाण वाढेल, त्यामुळे श्वसनाचे विकार बळावतीलध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळेल, सागराची पातळी १ ते ३ मीटर वाढेलउपाययोजनावातानुकूलित यंत्रांचा वापर कमी करावा लागेलप्लॅस्टिक, तत्सम वस्तूंचा वापर कमी करावा लागेलवाढते शहरीकरण, ओद्योगिकीकरण थांबवणे गरजेचे आहेकार्बन, क्लोरीन व बोमीन या ओझोनच्या ºहास करणाºया वायूंचे उत्सर्जन थांबवणेवृक्ष लागवड करणे व त्यांचे जतन करणे
...तर मुंबईसारखी शहरे पाण्यात जातील तज्ज्ञांना भीती : ओझोनची पातळी कमी होत असल्याने चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 7:05 AM