Join us

तज्ज्ञांनी कॅन्सरवर नवीन उपाय शोधले पाहिजेत, गिरीश महाजन यांनी व्यक्त केली अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 1:01 PM

मुंबईत इंडियन कॅन्सर काँग्रेस या परिषदेचे आयोजन केले आहे.

मुंबई : कॅन्सरच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. इंडियन कॅन्सर काँग्रेसच्या निमित्ताने तज्ज्ञ आणि अनुभवी कॅन्सरतज्ज्ञ मुंबईत जमले आहेत, त्यामुळे सर्वांनी कॅन्सरच्या नवीन आव्हानांबद्दल चर्चा करून त्यावर उपाय शोधले पाहिजेत, अशी अपेक्षा  ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.मुंबईत इंडियन कॅन्सर काँग्रेस या परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेत कॅन्सर आजाराच्या अनुषंगाने वेगवेगळ्या वक्त्यांनी संशोधन पेपर सादर केले आहेत. या परिषदेतही देशतील कॅन्सर विशेषज्ञ, नामवंत चिकीत्सक यामध्ये सहभागी झाले आहेत. या परिषदेचे आयोजनात डॉ. रमन देशपांडे, डॉ. संजय शर्मा, डॉ. देवेंद्र चौकर, डॉ. संदिप गुप्ता, डॉ. धर्मेश शहा, अमेरिकेतील डॉ. चंद्रकांत अहिरे या आणि इतर तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग होता.

२०१५ मध्ये महाराष्ट्रात ९० हजारांहून अधिक कॅन्सरचे रुग्ण नोंदवले गेले आहेत. २०२५ पर्यंत ही संख्या १.२५ लाखांपेक्षा अधिक वाढण्याचा अंदाज आहे.राज्यात महात्मा जोतिबा फुले जीवनदायी योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेवरील रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत. सध्या राज्यात प्रत्येक नागरिकाला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने ५० कोटी लाभार्थींना आयुष्मान भारत अंतर्गत ५ लाखांपर्यंतचे विमा संरक्षण दिले आहे.

टॅग्स :मुंबईकर्करोग