Join us

एक्स्प्लेन्ड मेन्शन अतिधोकादायक इमारत, पावसाळ्यापूर्वी घरे खाली करण्याच्या नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 2:17 AM

म्हाडाने २३ इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर केल्या असून या इमारतींमध्ये अद्याप दीड हजार रहिवासी आपला जीव मुठीत घेऊन राहत आहेत.

मुंबई : दक्षिण मुंबईतील एक्स्प्लेन्ड मेन्शन ही इमारत गेल्या बऱ्याच वर्षांपासून धोकादायक इमारतींच्या यादीत येत आहे, मात्र या इमारतीमधील रहिवासी इमारत रिकामी न करता न्यायालयामध्ये गेले आहेत. यामुळे हे प्रकरण सध्या चर्चेत आहे. ही इमारत ३० तारखेपर्यंत खाली करता येणार नसल्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. आता पुन्हा ही इमारत म्हाडाच्या धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये आल्याने आता म्हाडा काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. म्हाडाने २३ इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर केल्या असून या इमारतींमध्ये अद्याप दीड हजार रहिवासी आपला जीव मुठीत घेऊन राहत आहेत.

या २३ अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींमध्ये ५०७ निवासी आणि ३०८ अनिवासी असे एकूण ८१५ कुटुंबीय आहेत. यातील बहुतांश कुटुंबीयांना म्हाडाच्या संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतरित केले असून ३९१ कुटुंबीयांना म्हाडाने नोटिसा देऊनही गाळे खाली न केल्याने हे रहिवासी अद्याप या धोकादायक इमारतींमध्ये राहत आहेत. या रहिवाशांना पावसाळ्यापूर्वी स्थलांतरित करणार असून वेळ पडल्यास पोलीस बळाचाही वापर करू, असे म्हाडाच्या वतीने स्पष्ट केले आहे.

अजूनही ३९१ कुटुंबीय अतिधोकादायक इमारतींमध्येचम्हाडाने अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना नोटिसा देऊनही अद्याप या इमारतींमधील रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. या इमारती कधीही कोसळून एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. मात्र हे ३९१ कुटुंबीय घरे खाली करण्यास तयार नाहीत. या कुटुंबीयांमध्ये सुमारे दीड हजार रहिवासी राहत असून त्यांना संक्रमण शिबिरांमध्ये स्थलांतरित करण्याचे प्रयत्न म्हाडा करत आहे.2019 सर्वेक्षणातील अतिधोकादायक इमारती

  • 144, एम.जी. रोड, एक्स्प्लेन्ड मेन्शन
  • 208-220 काझी सय्यद स्ट्रीट
  • 22-24, उमरखाडी 2 री क्रॉसलेन, मुंबई सिराज लेन
  • 145-151, आरसी वालाबिल्डिंग
  • 152-154,चिमना बुचर स्ट्रीट
  • 101 -111 बारा इमाम रोड,
  • 74, निझाज स्ट्रीट,
  • 123, किका स्ट्रीट
  • 387-391, बदामवाडी, व्ही.पी. रोड,
  • 218-220, डी 1231 (1) & डी-1231(3) राजाराम मोहन राय मार्ग
  • 5 जे सुनंदा बिल्डिंग, डी-1615(2) दुभाष लेन, गिरगाव,
  • 419 नूर मोहम्मद बेग, मोहम्मद कंपाउंड, डी-469 व्ही.पी. रोड,
  • 443 वांदेकर मेन्शन, डी-431 डॉ.-431 डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग, गिरगाव
  • 226-228, राजाराम मोहन मार्ग, गिरगाव,
  • 241-251, डी-1194 राजाराम मोहन रॉय मार्ग, गिरगाव
  • 58-खत्तर गल्ली, मधुसुदन बिल्डिंग खत्तर गल्ली, गिरगाव
  • 69-81, खेतवाडी 3 री गल्ली, गणेश भुवन
  • इमारत 39, चौपाटी, सी फेस
  • सीएस नं. 829,1/829 आणि 830 दादाभाई चाळ क्रमांक 5, लोअर परेल
  • 37 डी, बॉम्बे हाउस, डॉकयार्ड रोड
  • 23 सक्सेस रोड, माझगाव
  • 1-1 ए, 3-3 ए, हाथीबाग, डी.एन. सिंग रोड
टॅग्स :म्हाडापाऊस