Join us

स्फोटके प्रकरणातील पवारच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे हाती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 6:09 AM

वाढीव कोठडीसाठी आज न्यायालयात हजर करणार

मुंबई : दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) स्फोटके प्रकरणात घाटकोपरमधून अटक केलेला पाचवा आरोपी अविनाश पवार (३०) याच्या चौकशीतून महत्त्वाचे धागेदोरे एटीएसच्या हाती लागले. याबाबतच्या अधिक चौकशीसाठी शुक्रवारी त्याला वाढीव कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

नालासोपारासह राज्याच्या विविध भागांतून हस्तगत केलेली स्फोटके, शस्त्रसाठ्याशी आणि त्या प्रकरणी अटकेत असलेल्या कट्टरवाद्यांशी पवारचा संबंध पुढे आल्यानंतर ही कारवाई केल्याचे एटीएसने स्पष्ट केले. नालासोपारा येथून हस्तगत केलेले गावठी बॉम्ब पवारने तयार केले असावेत, असा संशयही एटीएसला आहे. त्याच संशयातून एटीएसकडून २५ आॅगस्ट रोजी गैरकृत्ये प्रतिबंधक कायद्यान्वये (यूएपीए) पवारला अटक करण्यात आली. शुक्रवारी त्याची कोठडी संपत असल्याने त्याला वाढीव कोठडीसाठी सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पवारचे अनेक हिंदुत्ववादी संघटनांशी संबंध असल्याचेही समोर आले. त्याच्या चौकशीतून अनेक महत्त्वपूर्ण माहिती समोर आल्याचे एटीएस सूत्रांकडून समजते. त्यानुसार एटीएसकडून अधिक तपास सुरू आहे. तसेच त्याच्या मोबाइल सीडीआरच्या माहितीतून समोर आलेल्या संशयितांकडेही एटीएस तपास करीत आहे.

टॅग्स :घाटकोपरपोलिस