नालासोपा-यातील स्फोटक प्रकरण, आरोपी श्रीकांत पांगारकरला पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 01:20 PM2018-08-20T13:20:58+5:302018-08-20T13:21:28+5:30
नालासोपा-यातील सापडलेल्या स्फोटक प्रकरणात संशयित असलेला शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर (41) याला शनिवारी एटीएसने स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली
मुंबईः नालासोपा-यातील सापडलेल्या स्फोटक प्रकरणात संशयित असलेला शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर (41) याला शनिवारी एटीएसने स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली होती, त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयानं श्रीकांतला 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुणे आणि मुंबई येथील एटीएस पथकातील पोलीस श्रीकांतच्या घरावर पाळत ठेवून होते. पूर्ण खात्री पटल्यावर त्याला त्याच्या महसूल कॉलनीतील ‘राधेय’ या घरातून ताब्यात घेण्यात आले होते. तो शिवसेनेकडून दोनदा नगरसेवक होता. कट्टर हिंदुत्ववादी म्हणून त्याची जालन्यात ओळख आहे. मध्यंतरी तो जालन्याऐवजी गोवा तसेच कोल्हापूर परिसरात वास्तव्यास होता.
एटीएसचे पोलीस घरी आले तेव्हा कुटुंबीयांनी आमचा मुलगा असा गुन्हा करू शकत नाही, तुम्ही त्याला बळजबरीने अटक करत आहात, असा आरोप केला होता. काही महिन्यांपासून श्रीकांतवर पोलिसांची बारीक नजर होती.
Shrikant Pangarkar arrested by Anti-Terrorism Squad under the Explosive Substances Act, Explosives Act and Unlawful Activities (Prevention) Act from Jalna yesterday, sent to police (ATS) custody till 28 Aug. He wasn't arrested in connection with Narendra Dabholkar murder case. https://t.co/L4toAdkCCp
— ANI (@ANI) August 20, 2018