युके, युरोपमध्ये १२ हजार हापूसच्या आंब्यांची निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:06 AM2021-04-10T04:06:45+5:302021-04-10T04:06:45+5:30

काेराेना काळासह सर्व अडचणींवर मात लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोकणातील वातावरणात वाढता उष्मा, अनियमित हवामानामुळे यंदा हापूस आंब्याचे ...

Export of 12,000 hapus mangoes to UK, Europe | युके, युरोपमध्ये १२ हजार हापूसच्या आंब्यांची निर्यात

युके, युरोपमध्ये १२ हजार हापूसच्या आंब्यांची निर्यात

Next

काेराेना काळासह सर्व अडचणींवर मात

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोकणातील वातावरणात वाढता उष्मा, अनियमित हवामानामुळे यंदा हापूस आंब्याचे उत्पन्न काहीसे घटले असताना कोरोना महामारीचे प्रमाण पुन्हा वाढल्याने हापूस आंब्याच्या व्यापाराला फटका बसत आहे. मात्र ‘ग्लोबल कोकण’ आणि ‘मायको’च्या पुढाकाराने सर्व अडचणींवर मात करत युके आणि युरोपमध्ये एक हजार डझन हापूस निर्यात करण्यात आला.

ग्लोबल कोकणचे संस्थापक संजय यादवराव म्हणाले की, यंदा कोकणातील हापूस आंब्याच्या उत्पन्नात घट झाली आहे. परदेशी विमान वाहतूक बंद असल्याने अनेक ठिकाणी यंदा हापूसची निर्यात करणे शक्य नाही. शिवाय कोरोना महामारीमुळे हापूसचा बाजारपेठेतील एकंदरीत व्यवहार, परदेशातील निर्यात या सगळ्यांवर परिणाम होत आहे. या सर्व आव्हानांना सामोरे जात कोकणातील शेतकऱ्यांना, आंबा बागायतदारांना मुंबई, महाराष्ट्रसह परदेशातील बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. युरोप आणि युकेमध्ये हापूस आंब्याला एक वेगळाच मान असून मागणीही मोठ्या प्रमाणावर आहे. ३१ मार्चला लंडन, जर्मनी आणि हॉलंडला १ हजार डझन हापूस निर्यात करण्यात आले.

* काेकणातील शेतकऱ्यांचा डिजिटल प्लॅटफाॅर्म

काेकणातील १०० शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बनवलेला मायकाे हा पहिला डिजिटल प्लॅटफाॅर्म आहे. आंब्याच्या माेसमात बाजारपेठेत अनेकदा भेसळयुक्त, रासायनिक फवारणी करून पिकवलेले आंबे पहायला मिळतात. पण ही सर्व पद्धती मोडून काढत मुंबई, महाराष्ट्रसह जगभरातील आंबा प्रेमींना कोणतीही भेसळ नसलेला अस्सल हापूसचा आंबा देणे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे ‘मायको’चे सीईओ दिप्तेश जगताप म्हणाले. काही विमान कंपन्यांनी परदेशातील हापूस निर्यातीसाठी भाडेवाढ केली आहे. मात्र या प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाचा योग्य आर्थिक मोबदला देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

................................

Web Title: Export of 12,000 hapus mangoes to UK, Europe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.