Join us

निर्यातीतही झळाळी

By admin | Published: June 23, 2016 4:02 AM

उद्योगक्षेत्राला बळकटी मिळाल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून निर्यात क्षेत्राला झळाळी प्राप्त झाली आहे. करिअरच्या उत्तमोत्तम संधी यात उपलब्ध असून, वेगळी वाट चोखाळणाऱ्यांनी फॉरेन

मुंबई : उद्योगक्षेत्राला बळकटी मिळाल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून निर्यात क्षेत्राला झळाळी प्राप्त झाली आहे. करिअरच्या उत्तमोत्तम संधी यात उपलब्ध असून, वेगळी वाट चोखाळणाऱ्यांनी फॉरेन ट्रेड अर्थात निर्यात क्षेत्रात करिअर करण्यास काहीच हरकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्ट इंडियाला चालना दिल्यामुळे अनेक उद्योगधंद्यांना पुन्हा उभारी आली आहे. देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या उद्योगधंद्यांमुळे जगाच्या नकाशात आपला देश छाप पाडत आहे. अशाच अभ्यासाची परिपूर्ण माहिती देणारा फॉरेन ट्रेड, इंटरनॅशनल मॅनेजमेंट अथवा ट्रेड मॅनेजमेंटचा अभ्यास अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. गणित विषय चांगला असलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. यात पदवी आणि पदविका अभ्यासक्रम असून, याचा कालावधी दीड ते तीन वर्षांपर्यंतचा आहे. यात फॉरेन ट्रेडसोबत इंटरनॅशनल बिझनेस हा विषय देखील आहे. यानंतर पदव्युत्तर पदवी, पीच.डी. अभ्यासक्रम आहेत. शिवाय आयात- निर्यात विषयात तुम्ही एमबीए सुद्धा करू शकता. या अभ्यासक्रमात मार्केटिंग, डॉक्युमेंटेशन, शिपिंग आणि पॅकेजिंग, कॉस्टिंग, सोर्सिंग, मार्केट रिसर्च, एक्सपोर्ट फायनान्स, फॉरेन एक्सचेंज हे विषय शिकविले जातात. (प्रतिनिधी)करिअरच्या संधीपदवी किंवा पदविका मिळवल्यानंतर आयात-निर्यात क्षेत्राशी संबंधित ठिकाणी नोकरी मिळू शकते. मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, फायनान्शिअल इन्स्टिट्यूट, बँका आणि शासकीय कार्यालयात देखील नोकरी मिळू शकते. शिवाय तुम्ही स्वत:चा व्यवसायदेखील करू शकता.पात्रता कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो. यासाठी किमान ५०% गुणांची आवश्यकता असते. तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना वाणिज्य शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असते. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा, मुलाखत आणि समूह चर्चा या पायऱ्या पार पाडाव्या लागतात.गरवारे इन्स्टिट्यूट आॅफ करिअर एज्युकेशन अ‍ॅँड डेव्हलपमेंट, मुंबई विद्यापीठइंडियन इन्स्टिट्यूट आॅफ एक्सपोर्ट इंपोर्ट मॅनेजमेंटसिडनेहॅम कॉलेज आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्सकिशनचंद चेलाराम कॉलेज आॅफ मॅनेजमेंट स्टडीजआयसीआयटी कॉलेज आॅफ मॅनेजमेंट मिटकॉन उद्योग प्रबोधिनी, पुणेसिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट आॅफ इंटरनॅशनल बिझनेस, पुणेदिल्ली स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स, दिल्लीअनेक खासगी संस्थांमध्येही हा अभ्यासक्रम शिकविला जातो.