सोने तस्करीचा पर्दाफाश; आठ जणांना अटक; केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 02:58 PM2023-10-13T14:58:43+5:302023-10-13T14:59:08+5:30
याप्रकरणी ३ कोटी ६२ लाख रुपये मूल्याचे सोने, २ कोटी रोख रक्कमही जप्त केली आहे.
मुंबई : तस्करीद्वारे मुंबईत आलेल्या आणि मुंबईत झवेरी बाजार येथील एका ज्वेलरच्या दुकानात ते सोने वितळवून पुन्हा विक्री करणाऱ्या रॅकेटचा केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी ४ केनियन महिला, टांझानियाची एक महिला व ३ भारतीयांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी ३ कोटी ६२ लाख रुपये मूल्याचे सोने, २ कोटी रोख रक्कमही जप्त केली आहे.
- परदेशी नागरिकांच्या माध्यमातून तस्करीद्वारे मोठ्या प्रमाणावर सोने मुंबईतील एका ज्वेलरीच्या दुकानामध्ये येत असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. हा सुवर्ण व्यापारी या टोळीकडून नियमितपणे सोन्याची खरेदी करत होता.
- यापूर्वी देखील त्याच्यावर अशाच प्रकरणात कारवाई झाली होती. त्याच्यावर छापेमारी करण्यापूर्वी त्याला ज्या परदेशी नागरिकांकडून सोने मिळत होते, त्यांच्यावर देखील अधिकाऱ्यांनी पाळत ठेवली.