Join us

वेळेआधी एक्स्प्रेस आरक्षण खुले; प्रवासी ‘वेटिंगवर’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 6:00 AM

गणेशोत्सवासाठी पश्चिम रेल्वेसह मध्य आणि कोकण रेल्वेने शेकडो विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : गणेशोत्सवासाठी पश्चिम रेल्वेसह मध्य आणि कोकण रेल्वेने शेकडो विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, पश्चिम रेल्वेच्या गणेशोत्सव विशेष ट्रेनचा फायदा होण्याआधी शुक्रवारी हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मुंबई सेंट्रल-थिविम गणपती विशेष एक्स्प्रेस आरक्षण करण्यासाठी आवश्यक माहिती प्रवासी आरक्षण यंत्रणेमध्ये (पीआरएस) भरत असताना, नजर चुकीने २० जुलै २०१८ ऐवजी २० जुलै २०१७ ही तारीख टाकण्यात आली. परिणामी, वेळेआधी इंटरनेटवरून तिकीट विक्री सुरू झाल्यामुळे खिडकीवरील प्रवाशांना वेटिंगचा सामना करावा लागला.गणेशोत्सवासाठी पश्चिम रेल्वेच्या ६ फेऱ्या आणि कोकण रेल्वेच्या ३ फेºयांचे आरक्षण शुक्रवारी सकाळी ८ वाजता खुले होणार होते. रेल्वेतील डेटा अधीक्षक पदावरील कर्मचाºयांने २०१८ ऐवजी २०१७ हे वर्ष टाकले.परिणामी, सकाळी ८ वाजता खुले होणारे आरक्षण ७ वाजून १० मिनिटांनी खुले झाले. सकाळी ७ वाजून २१ मिनिटांनी पहिले तिकीट आरक्षित करण्यात आले. परिणामी, अवघ्या २० मिनिटांत १३५ तिकिटे आरक्षित करण्यात आले. यात८ सप्टेंबरची १३ तिकिटे, १० सप्टेंबरची ११९ तिकिटे आणि १५ सप्टेंबरची३ तिकिटे आरक्षित करण्यातआली. या ट्रेनची प्रवासी आसन क्षमता ८१६ असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.दरम्यान, शुक्रवारपासून सुरू होणाºया गणेशोत्सव विशेष अन्य ट्रेनच्या तिकीट आरक्षणाबाबतदेखील चौकशी करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.संबंधित रेल्वे अधिकाºयांच्या अनावधानाने २०१८ ऐवजी २०१७ असे टाकण्यात आले होते. नियमांनुसार संबंधित डेटा अधीक्षकावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. लवकरच पीआरएस यंत्रणेत आवश्यक त्या सुधारणादेखील करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.>पीआरएस यंत्रणेला ‘अपग्रेडची’ गरजसेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन यंत्रणेच्या (क्रिस) अखत्यारित असलेल्या प्रवासी आरक्षण यंत्रणेत (पीआरएस) आजदेखील जुन्या तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याचा धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे. मुळात सध्या आयआरसीटीसीसह विविध तिकीट आरक्षण संकेतस्थळावर तिकीट आरक्षण करता येतात. मात्र, अन्य संकेतस्थळावर जुन्या तारखेनुसार तिकीट आरक्षण होत नाही. यामुळे रोज लाखो प्रवाशांकडून वापर होणाºया पीआरएस यंत्रणेत अपग्रेड तंत्रज्ञान वापरण्याची गरज असल्याची क्रिस अधिकाºयांनी गोपनीयतेच्या अटीवर सांगितले.>अन्य व्यक्तींकडून तिकिटे आरक्षितनियमानुसार, १२० दिवस आधी विशेष ट्रेनचे बुकिंग सुरू होते. यापैकी काही तिकिटे प्रवाशांच्या व्यतिरिक्त अन्य व्यक्तींकडून आरक्षित करण्यात आलेली आहे. मुंबई-थिविम साप्ताहिक विशेष ट्रेनच्या आरक्षणाचे नियंत्रण रेल्वेकडून करण्यात येते, याचा आयआरसीटीसीचा सहभाग नसल्याचे आयआरसीटीसीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.>प्रवाशांना दिलासागणेशोत्सव विशेष मुंबई-थिविम ट्रेनचे तिकीट ज्या प्रवाशांनी आरक्षित केले आहे. त्यांना त्याच कन्फर्म तिकिटांवरून प्रवास करता येणार आहे. या प्रवाशांचे तिकीट रद्द करण्यात येणार नाही, असे मध्य रेल्वेच मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.

टॅग्स :रेल्वेरेल्वे प्रवासी