सुशोभित प्रगती एक्स्प्रेसमध्येही चोरट्या प्रवाशांची हातसफाई, १५ दिवसांतच सामानाच्या चोऱ्या सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 03:52 AM2018-11-20T03:52:16+5:302018-11-20T03:53:27+5:30

‘उत्कृष्ट’ योजनेखाली आतून-बाहेरून नव्या रुपड्यात मुंबई आणि पुणे या दरम्यान धावू लागलेल्या मध्य रेल्वेच्या प्रगती एक्स्प्रेसमध्येही चोरट्या प्रवाशांनी हातसफाई सुरु केली आहे!

In the Express, smugglers are looted, stolen goods in 15 days | सुशोभित प्रगती एक्स्प्रेसमध्येही चोरट्या प्रवाशांची हातसफाई, १५ दिवसांतच सामानाच्या चोऱ्या सुरू

सुशोभित प्रगती एक्स्प्रेसमध्येही चोरट्या प्रवाशांची हातसफाई, १५ दिवसांतच सामानाच्या चोऱ्या सुरू

googlenewsNext

मुंबई : ‘उत्कृष्ट’ योजनेखाली आतून-बाहेरून नव्या रुपड्यात मुंबई आणि पुणे या दरम्यान धावू लागलेल्या मध्य रेल्वेच्या प्रगती एक्स्प्रेसमध्येही चोरट्या प्रवाशांनी हातसफाई सुरु केली आहे! पहिल्या १५ दिवसांतच या गाडीतील ४३ हजार रुपयांचे सामान चोरीला गेले आहे.
मुंबईहून पनवेलमार्गे जाणारी ही सुशोभित प्रगती एक्स्प्रेस ४ नोव्हेंबरपासून धावू लागली. रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या १५ दिवसांत या गाडीच्या वॉशरूममधील स्टीलचे २८ नळ, लाकडी चौकटीत बसविलेले आठ आरसे, मोबाईल चार्जिंगसाठी बसविलेले तीन होल्डर, संडासातील फवाºयाची नळी अडकविण्याचे स्टीलचे २५ होल्डर चोरट्यांच्या हातसफाईला बळी पडले आहेत.
याशिवाय गाडीच्या डब्यांमध्ये ठेवलेले स्टीलचे १६ डस्टबिन, ‘उत्कृष्ट एक्स्प्रेस’च्या लोगोचे चार स्टीकर गायब होण्याखेरीज वॉशरूममधील फरशांचीही मोडतोड झाल्याचे गाडीच्या नियमित तपासणीत आढळून आले आहे.
खरवडता येणार नाही असे व्हिनिल रॅपिंग, अंधांसाठी ब्रेल लिपीतील स्टीकर शौच विधीनंतर वापरण्यासाठी फवाºयाची नळी, लाकडी चौकटीत बसविलेले आरसे, सामान ठेवण्यासाठी स्टीलचे रॅक, मोबाईल चार्जिंगसाठी अ‍ॅक्रेलिकचे होल्डर, सरकविता येणारे पडदे अशा साजोसज्जेने प्रगती एक्स्प्रेसचे रुपडे रेल्वेने अधिक सुखावह व आकर्षक केले होते.
रेल्वे ही सार्वजनिक मालमत्ता आहे हे लक्षात घेऊन तिची जपणूक करण्याचे सामाजिक भान आपल्याकडे नाही. यातूनच रेल्वे गाड्या खराब करणे व त्यातील सामान चोरून नेणे हे प्रकार होत असतात.मुंबई व गोवा दरम्यान धावणाºया ‘तेजस एक्स्प्रेस’मधूनही सामानाच्या अशा चोºया झाल्या होत्या व डब्यांमध्ये बसविलेले एलसीडी स्क्रीनही लोकांनी काढून नेले होते. बरे, या चौर्यकर्मांमध्ये गरीब-श्रीमंत असा भेदभाव नाही. एसी डब्यांमध्ये प्रवाशांना दिल्या जाणाºया ‘बेडरोल’मधील हात पुसायचे १२.८३ लाख टॉवेल, ४.७१ लाख बेडशीट््स आणि ३.१४लाख उशांचे अभ्रे गेल्या वर्षी चोरीला गेल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाले होते.

प्रवाशांना आधुनिक सोयीसुविधा व सेवा देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. प्रवाशांनी नासधूस होणार नाही अशा तºहेने एक्स्प्रेसमधील सर्व सुविधांचा काळजीपूर्वक वापर करावा, अशी अपेक्षा आहे.
-सुनील अडसी,
मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Web Title: In the Express, smugglers are looted, stolen goods in 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे